'त्या' महिलेबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल
Wednesday, Apr 4 2018 5:38PM    CHECKMATE TIMES
Tags: bhima koregaon, bhima koregaon riot, facebook, socia media, cyber crime, milind ekbote, sambhaji bhide, bhide guruji, ravindra shinde, deepak padwal, wakad police station, pimpri police station 1000006375

पुणे दि.४ (चेकमेट टाईम्स): एकमेकांना जोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'फेसबुक' चा वापर आता समाजात द्वेष पसरविण्यासाठी केला जात आहे. कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्याविरुद्ध एका महिलेने तक्रार दिली होती. या महिलेच्या फेसबुक अकाऊंट वर आक्षेपार्ह व बदनामीकारक पोस्ट टाकल्या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रविंद्र शिंदे, दिपक पडवळ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात सर्वात पहिली तक्रार एका महिलेने दिली होती. त्यानुसार मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली असून, गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

 

दोन दिवसांपूर्वी या महिलेच्या फेसबुक अकाऊंट वर काही तरुणांनी आक्षेपार्ह व बदनामीकारक पोस्ट टाकली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी कारवाईसाठी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पिंपरी आणि वाकड पोलीस स्टेशन मधे तक्रार दिली होती.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000087