छिंदम विरोधात शिवसन्मान मोर्चा; १६० शिवप्रेमींवर गुन्हा दाखल
Friday, Apr 6 2018 1:13PM    CHECKMATE TIMES
Tags: ahmadnagar, shripad chindam, shiv sanman morcha, shivaji maharaj, shiv jayanti, viral audio clip, mahrashtra, udio clip causes tension, morcha without permission in nagar, 1000006400

पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांबद्दल अहमदनगर चे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमने अपशब्द काढले होते. त्यामुळे मध्यंतरी राज्यातील वातावरण प्रचंड तापले होते. राज्याबाहेर पळून गेलेला छिंदम पुन्हा नगर शहरात आल्याचे कळताच त्याच्या विरोधात शिवसन्मान मोर्चा काढण्यात आला होता. विना परवानगी मोर्चा काढल्याप्रकरणी १६० शिवप्रेमींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवजयंतीला काही दिवस बाकी असतानाच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामध्ये छिंदम ने शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते. या घटनेनंतर महाराष्ट्रात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची राजकीय किंमत देखील छिंदमला मोजावी लागली होती. त्यानंतर छिंदम राज्यातून परागंदा झाला होता.  

 

छिंदमचे नगर शहरात आगमन झाल्याची बातमी नुकतीच शिवप्रेमींना समजली होती. त्यामुळे सर्व शिवप्रेमींनी एकत्र येऊन नगरमध्ये शिवसन्मान मोर्चा काढला. छिंदमला महाराष्ट्रातून हद्दपार करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

दरम्यान, परवानगी नसताना शिवसन्मान मोर्चा काढल्याबद्दल शिवप्रेमींवर कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसन्मान मोर्चावर गुन्हे दाखल करायला लावून भाजप पेशवाई सरकार आल्याचे सिद्ध करत आहे, अशी भावना शिवप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Politics,   Business Category: NA   Similar News ID: 1000000128