‘तीन तलाक’ विधेयकाला जोरदार विरोध; प्रशासनाला निवेदन
Saturday, Apr 7 2018 7:12PM    CHECKMATE TIMES
Tags: Triple talaq, supreme court, beed, triple talaq bill, chandrakant suryavanshi, district collector, what is triple talaq, supreme court decision on triple talaq, oppose to triple talaq bill, shariyat law, all india muslim personal law board 1000006420

पुणे दि.७ (चेकमेट टाईम्स): ‘तीन तलाक’ संबंधी सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. मात्र, या निर्णयाला मुस्लीम समाजातील काही घटकांनी तीव्र विरोध केला होता, तसेच हा विरोध आता वाढताना दिसत आहे. बीड येथील आडत मार्केट जवळील मैदानावर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड समाज सुधार कमिटीच्या वतीने आयोजित आमसभेला  ‘हुकूमत अपना काम करे, इस्लाम को ना बदनाम करे’, शरियत हमारी पहचान है असे विविध घोषवाक्य असलेले नामफलक हाती घेऊन मुस्लीम महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.

 

यावेळी झालेल्या आम सभेत उपस्थित ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या सदस्या आणि येथील महिलांनी इस्लामी शरियत हमारा गर्व हैअसे ठणकावून सांगत शरियतमधील हस्तक्षेप खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. सात महिलांनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले.

 

आमसभेच्या अध्यक्षस्थानी बीड येथील सदस्या खान सबिहाबाजी होत्या तर व्यासपीठावर आफरीनबाजी उपस्थित होत्या. यावेळी मुस्लिम समाजातील महिला आणि मुली हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या. ‘तीन तलाक बिल वापस लो’, राष्ट्रपती के भाषण की हम निंदा करते है असे विविध घोषवाक्य असलेले फलक सभास्थळी उपस्थित महिला आणि युवतींच्या हातामध्ये होते. यावेळी फिरदोस फातेमा रमजान खान, महेजबीन अब्दुल बाकी, अनम इमरोज मोहंम्मद जावेद अली, नसरीन बेगम नुसरत अली, शेख आफरीन मुख्तार, काझी वसीया तकविम काझी मकबुल, मिर्झा रजिया सलीम बेग या सात महिलांनी निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले.

 

निवेदनात म्हटले आहे की, तीन तलाक विधेयक घटना विरोधी तसेच महिला व बालकल्याण विरोधी आहे. विधेयक तयार करताना कोणत्याही मुस्लिम धर्मगुरु किंवा विचारवंतांशी चर्चा करण्यात आलेली नाही. सदरील विधेयकावर पुनर्विचार करुन ते त्वरीत परत घेण्यात यावे. मुस्लिम महिलांना घटनेने दिलेले स्वातंत्र्य व अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करु नये. 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Bid,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000157