सदगुरु कृपेने निराकार ईश्वराची प्राप्ती संभव: श्री. शिरीष डोंगरे
Friday, Apr 20 2018 2:34PM    CHECKMATE TIMES
Tags: sant nirankari satsang alandi, sant nirankari mandal, sant nirankari satsang bhavan, sant nirankari shirish dongre, purpose of sant nirankari mission 1000006560

पुणे दि.२० (चेकमेट टाईम्स): निरंकारी सदगुरु माता सविंदर हरदेव सिंह जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने विशाल निरंकारी सत्संग नगरपरिषद शाळा क्र. ४, आळंदी येथील खुल्या प्रांगणामध्ये सोमवार (दि.१६) रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत संपन्न झाला. या कार्यक्रमाला भोसरी सेक्टर मधून २५०० पेक्षा अधिक संत भाविक सज्जन उपस्थित होते.

 

निरंकारी माताजीं चे परम शिष्य श्री. शिरीष डोंगरे (सांगली) यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये  तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे हा विशाल निरंकारी सत्संग सोहळा संपन्न झाला. त्यांनी आपल्या विचारांमधून समजावले कि, "संत निरंकारी मिशन हा नवीन धर्म नाही, प्रांत नाही. हे एक आध्यात्मिक आंदोलन असून, एक आध्यात्मिक चळवळ आहे. जगामध्ये देव एक असून, तो देव स्वरूपाने निर्गुण - निरंकार आहे, सर्वांच्या अंग - संग आहे. तो सर्वव्यापी असून, अविनाशी आहे, आणि सदगुरु कृपेने ज्ञानदृष्टीने याला जाणता येते, पाहता येते. हि विचारसरणी सोबत घेऊन संत निरंकारी मिशन संपूर्ण विश्वामध्ये हा संदेश पोहोचवण्याचे कार्य करीत आहे."

 

जे ब्रह्मज्ञान सर्वांसाठी खुले करण्याची अनुमती ज्ञानेश्वर माऊली नी आपल्या सदगुरु कडे मागितली होती, तेच माऊलींचे कार्य निरंकारी सदगुरु माता सविंदर हरदेवजी महाराज आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्संग समाप्ती नंतर ४२ भाविकांनी ब्रह्मज्ञान प्राप्ती केली.

 

त्यांनी माऊली या शब्दाची उकल सर्व संतांसमोर ठेवली. त्यांनी सांगितले, "मा म्हणजे मानवता, ऊ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता असा त्रिवेणी संगम ज्यांच्याकडे होता ती म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली." त्यांनी पुढे समजावताना संत निरंकारी मिशन ची पंचसुत्रे सांगितली. ते म्हणाले १ ध्वज सत्याचा, १ ध्येय शांतीचा, १ धर्म मानवतेचा, १ भाषा प्रेमाची, १ ईश्वर निरंकार हि पंचसूत्रे ज्यांच्या जीवनात येतात त्या मनुष्याचे जीवन समाधानी होते.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश राऊत यांनी केले. या कार्यक्रमाला संत निरंकारी मंडळाचे पुणे झोन चे इंचार्ज ताराचंद करमचंदानी तसेच विकास पाटील, प्रभाकर तावरे (आरोग्य अधिकारी), भोसरी सेक्टर मधील सर्व ब्रांच चे मुखी, सेवादल अधिकारी, प्रबंधक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भोसरी सेक्टर प्रमुख अंगद जाधव यांनी केले.   
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000006