संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे देशभर रक्तदान शिबिरांचे आयोजन
Friday, Apr 20 2018 2:53PM    CHECKMATE TIMES
Tags: sant nirankari charitable foundation, blood donation camp by nirankari foundation, blood donation camp at marketyard, social programme on manav ekta divas, manav ekta divas blood donation camp 1000006561

पुणे दि.२० (चेकमेट टाईम्स): निरंकारी जगतामध्ये १९८१ सालापासून २४ एप्रिल हा दिवस 'मानव एकता दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी १९८० साली मिशन चे तिसरे सदगुरु बाबा गुरुबचन सिंह जी महाराज यांनी सत्य, प्रेम, शांतीमानव एकता यासाठी संघर्ष करताना आपल्या प्राणांची आहुती दिली होती. मार्च, १९८७ मध्ये बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी संत निरंकारी मंडळाच्या सर्वसाधारण सभेत २४ एप्रिल रोजी मानव एकता दिवसानिमित्त जागोजागी रक्तदान शिबिराचे आयोजन करून बाबा गुरुबचन सिंह जी आणि अन्य शहीद संतांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला.              

 

या वर्षी देशभरामध्ये मिशनच्या एकूण ३००० पेक्षा अधिक शाखांमध्ये २४ एप्रिल रोजी 'मानव एकता दिवस' साजरा होणार आहे. त्याचबरोबर संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारा ८३ रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातून संत निरंकारी सत्संग भवन, गंगाधाम, मार्केटयार्ड येथे मंगळवार (दि.२४) रोजी सकाळी ते ५:३० या वेळेत रक्तदानाचे महाभियान आयोजन करण्यात आले आहे.

 

मिशन च्या माध्यमातून पहिले रक्तदान शिबीर नोव्हेंबर १९८६ साली दिल्ली मध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्धघाटनाप्रसंगी मिशन चे तत्कालीन सदगुरु बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी स्वतः रक्तदान केले होते. त्यावेळेस ते म्हणाले होते, "रक्त नाल्यांमध्ये न वाहता ते नाड्यांमध्ये वाहावे."

 

आज संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन देशातील स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यां संस्था मध्ये अग्रेसर आहे. वर्ष २०१७ - १८ मध्ये देशामध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारा ४६० रक्तदान शिबीर आयोजित करून ७५ हजार ९०० युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे, तर पुणे जिल्ह्यामध्ये २४ रक्तदान शिबीरातून आतापर्यंत ४ हजार ५५२ युनिट रक्त जमा केलेले आहे.

 

रक्तदानाच्या मुख्य दिवशी अधिकाधिक रक्तदात्यांना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने गेल्या महिनाभरापासून संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन चे स्वयंसेवक गंगाधाम, मार्केटयार्ड च्या  परिसरात घरोघरी जाऊन रक्तदानाचे महत्व समजावून सांगत आहेत.

 

विशाल रक्तदान शिबिराच्या जनजागृती साठी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन चे स्वयंसेवक, तसेच सेवादल यांनी २० ते २२ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत पथनाट्य, रॅलीचे आयोजन पुणे परिसरात केले आहे. अशा विविध परिसरामध्ये जाऊन संत निरंकारी मिशन चा तसेच रक्तदान शिबिराचा आवाज पोहोचवण्यात येणार आहे.

 

पुणे जिल्ह्याचे संत निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज श्री. ताराचंद करमचंदानी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि, "आपण ही सर्वजण या रक्तदान शिबिरामध्ये सामील होऊन या मानवतेच्या कार्यामध्ये योगदान द्यावे."


27   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000006