कोरेगाव - भीमा हिंसाचार पूर्वनियोजित कट; सत्यशोधन समितीचा अहवाल सादर
Tuesday, Apr 24 2018 7:16PM    CHECKMATE TIMES
Tags: koregaon bhima riot, koregaon bhima riot pre planned, satyashodhan samiti report submitted, elgar parishad pune, kabir kala manch, republican panther, who planned koregaon riot, 1000006608

पुणे दि.२४ (चेकमेट टाईम्स): कोरेगाव - भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेला हिंसाचार हा माओवादी विचारांच्या संघटना आणि खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी गटाचा पूर्वनियोजित कट होता. या हिंसाचारामागे आंबेडकरी अथवा हिंदुत्ववादी संघटनांचा संबंध नसल्याचे सत्यशोधन समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे.

 

सत्यशोधन अहवाल समितीने पत्रकार परिषदेत हा अहवाल आज प्रसिद्ध केला. यावेळी भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत, सत्यशोधन अहवाल समितीचे सदस्य कॅप्टन स्मिता गायकवाड, सागर शिंदे, सुभाष खिलारे, दत्ता शिर्के, प्रदीप पवार आणि अॅड. सत्यजित तुपे उपस्थित होते.

 

शनिवारवाड्यावर ३१ डिसेंबर रोजी झालेल्या 'एल्गार' परिषदेचे आयोजक 'कबीर कला मंच', 'रिपब्लिकन पँथर' या संशयित माओवादी गटांची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच एल्गार परिषदेच्या आयोजकांपैकी असलेल्या सुधीर ढवळे आणि हर्षाली पोतदार हे 'एटीएस' ने अटक केलेल्या संशयित माओवाद्यांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे माओवाद्यांचे, एल्गार परिषदेचे आणि कोरेगाव-भीमा हिंसाचाराचे काय लागेबांधे आहेत याचा सखोल तपास करण्यात यावा अशी मागणीही सत्यशोधन समितीने केली.

 

वढू बुद्रूक येथे २८  डिसेंबर रोजी रात्री ग्रामपंचायतीची परवानगी न घेता वादग्रस्त आणि खोटा इतिहास पसरवणारा फलक लावण्यात आला होता. त्याच रात्री गावच्या पोलीस पाटलांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. परंतु पोलिसांनी याची त्वरित दखल घेतली नाही. जर पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केली असती तर कोरेगाव भीमा प्रकरण घडले नसते. त्यामुळे पोलीस खात्याने कोरेगाव भीमा प्रकरणात गृहखाते आणि मुख्यमंत्र्याची दिशाभूल केल्याचा आरोप करत विश्वास नांगरे पाटील, सुवेझ हक आणि पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000130