कोथरुड येथील 'तारांगण' सोसायटीतील मीटर बॉक्सने घेतला पेट
Monday, Apr 30 2018 8:41PM    CHECKMATE TIMES
Tags: meter box catches fire, meter box catches fire in kothrud, kothrud meter box fire incident, meter box catches fire in rambaug colony, tarangan society kothrud, erandawana fire brigade, 1000006676

अग्निशमन दलाच्या तत्परतेने दुर्घटना टळली; सुदैवाने जीवितहानी नाही

 

पुणे दि.३० (चेकमेट टाईम्स): कोथरुड येथील रामबाग कॉलनीतील 'तारांगण' सोसायटी येथील तीन मजली इमारतीत आज सोमवार (दि.३०) रोजी दुपारी दीड वाजता बेसमेंटमधे असणाऱ्या मीटर बॉक्सने पेट घेतल्याने आगीची घटना घडली. या आगीच्या तीव्रतेमुळे पूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरल्याने स्थानिक रहिवाशी अडकल्याची वर्दी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास मिळाली होती.

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाने घटनेचे स्वरुप पाहता एरंडवणा अग्निशमन केंद्रातील वाहन तातडीने रवाना केले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचताच काही जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला, तर दुसरीकडे इतर जवानांनी इमारतीत राहणाऱ्या सुमारे १५ / २० रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यास सुरूवात केली. त्याचवेळी जवानांना एक ज्येष्ठ महिला मंगला आगरकर (वय ८४) यांना धुरामुळे त्रास होत असून, त्या दुसऱ्या मजल्यावर असल्याचे समजले.

 

त्यानंतर तत्परतेने जवान किशोर बने यांनी मंगला आगरकर यांना इतर जवानांच्या सहाय्याने उचलून खाली आणले. खाली आल्यानंतर आगरकर यांनी सुटकेचा आनंद मानत अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले. त्याचवेळी विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी दाखल होऊन आग विझल्याची नोंद घेतली आणि धोका नसल्याची खात्री करत अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ सोडले.

 

सदर कामगिरीमध्ये एरंडवणा अग्निशमन केंद्राचे जवान ज्ञानेश्वर खेडेकर, किशोर बने, कोंडिबा झोरे, प्रवीण रणदिवे तर देवदूत क्विक रिस्पॉन्स टिमचे हेमंत कांबळे, शुभम गोल्हार, राकेश नाईकनवरे यांनी सहभाग घेतला.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 12,   Business Category: NA   Similar News ID: 1000000038