जुन्या भांडणाच्या रागातून 'वारजे' येथे तिघांना बेदम मारहाण
Tuesday, May 1 2018 4:27PM    CHECKMATE TIMES
Tags: three boys beaten by gang, students beaten due to previous enmity, sanket shinde, suresh dahire, warje police station, aditya dhumal hostel warje malwadi, students beaten in hostel, previous enmity quarrel, 1000006678

पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी सात ते आठ जणांच्या टोळक्याने तीन विद्यार्थ्यांना त्यांच्या रूममध्ये शिरून बेदम मारहाण केली. वारजे माळवाडी येथील 'धुमाळ हॅास्टेल' मध्ये झालेल्या या घटनेत तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवार (दि.२८) रोजी ही घटना घडली असून, याप्रकरणी वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत शिंदे (वय २२, रा. वारजे) याने वारजे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. त्यानुसार सुरेश दहिरे (वय २०, रा. म्हाडा वस्ती जवळ, दोडके गोठ्याच्या शेजारी, वारजे) याच्यासह इतर सात ते आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

 

तक्रारदार संकेत शिंदे आणि त्याचे दोन मित्र वारजे माळवाडी येथील 'आदित्य धुमाळ हॅास्टेल' च्या पहिल्या मजल्यावरील त्यांच्या रुममध्ये बसले होते. त्याचवेळी आरोपी सुरेश दहिरे आपल्या मित्रांसोबत तेथे आला. मागील वर्षी दसऱ्याच्या वेळी त्यांच्यात भांडण झाले होते. याच भांडणाचा बदला घेण्यासाठी सुरेश आणि त्याच्या मित्रांनी या तिघांना बेदम मारहाण केली. संशयित आरोपी सिद्धार्थ भुंबे याने त्याच्या हातातील कोयता उलटा करून तक्रारदाराच्या डोक्यात मारला. तसेच इतरांनी सळई, बांबू व विटांनी मारहाण केली. याबाबत वारजे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 32,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004