आंध्र प्रदेशमधील 'हे' गाव 'हिंदू गाव' म्हणून घोषित
Wednesday, May 2 2018 7:47AM    CHECKMATE TIMES
Tags: hindu village in andhra pradesh, hindu village kesalingayapalli, name of hindu village in andhra pradesh, hindu village status, concept of hindu village, andhra pradesh village declared as hindu village 1000006689

गावात हिंदू व्यतिरिक्त अन्य धर्मियांना प्रवेश नाही

 

पुणे दि.२ (चेकमेट टाईम्स): आंध्र प्रदेशमध्ये एक अतिशय वेगळीच घटना घडली आहे. येथील 'कडप्पा' जिल्ह्यातील 'केसालिंगायापल्ली' हे गाव गावकऱ्यांनी 'हिंदू गाव' म्हणून घोषित केले आहे. तशी पाटी देखील तेथे लावण्यात आली असून, अन्य धर्मियांना या गावात प्रवेश बंद करण्यात आला आहे. या गावाप्रमाणेच अन्य गावे देखील अशाच प्रकारची कृती करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, 'केसालिंगायापल्ली' या गावात २५० कुटुंब राहत असून, ती सर्व हिंदू आहेत. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी चर्चेने आणि संमतीने आपल्या गावाला 'हिंदू गाव' म्हणून जाहीर केले. त्याचबरोबर इतर धर्मियांना या गावात प्रवेश नसल्याचा फलक देखील लावण्यात आला आहे. या फलकावर 'या गावात सर्व हिंदू राहतात. त्यामुळे इतर धर्मियांना प्रवेश नाही. गावात कोणी हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्माचा प्रचार करू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. धर्म बदलणे म्हणजे आईच बदलणे आहे. असे लिहिण्यात आले आहे.

 

गावातील व्यक्तींच्या म्हणण्यानुसार या गावात ख्रिस्ती धर्म प्रचारकांचा वावर वाढला होता. आर्थिक दृष्ट्या मागास लोकांचे पैशाच्या जोरावर धर्मांतरण केले जात असे. त्यामुळे या लोकांना  गावात प्रवेश नाकारण्यात यावा अशी अनेकांनी मागणी केली होती. त्यानुसार हे 'हिंदू गाव' म्हणून घोषित करण्यात आले असून, अन्य धर्मियांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Hyderabad,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000006