रणरागिणीचा रुद्रावतार; बलात्कार करणाऱ्याचे कापले लिंग
Wednesday, May 2 2018 1:14PM    CHECKMATE TIMES
Tags: Rape, penis cut by women, rapist, fine, law 1000006697
उत्तरप्रदेश, दि.२ (चेकमेट टाईम्स): बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या एका नराधम पुरुषाचे रणरागिणी महिलेने लिंग कापल्याची धक्कादायक, तेवढीच कौतुकास्पद घटना उत्तर प्रदेशमधील इटवाह येथे घडली आहे. 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, इटावामधील दुर्गापूर गावात राहाणारी पीडित महिला मंगळवार (दि.१) रात्री घरात एकटीच होती. त्या संधीचा फायदा घेण्यासाठी गावातीलच मनोज कुमार हा तरुण तिच्या घरात घुसला व तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करू लागला.

यावेळी महिलेने प्रसंगावधान राखत स्वतः चे शील वाचवण्यासाठी त्याला प्रचंड प्रतिकार केला. यावेळी ती एवढ्यावरच थांबली नाही, तर त्यावर तुटून पडत मारहाण करून घरातील खांबाला बांधत, स्वयंपाकघरातील चाकू आणून त्याचे लिंगच छाटून टाकले.

यानंतर पीडित महिलेने तातडीने पोलिसांना फोन करून कळवल्यानंतर घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडलेल्या मनोजला पोलिसांनी सैफई जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

एकूणच तिने तिचे शील वाचवण्यासाठी केलेले कृत्य नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र तिने कायद्याचे उल्लंघन केले असून, ती गुन्हेगार असल्याचे बोलले जाते आहे. अशावेळी पोलीस प्रशासन, शासन आणि न्यायालय काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सुज्ञ वाचकांचे यावर काय मत आहे ?

225   
0
प्रतिक्रिया
1000001711 Harshal patwari   from  Pune     May 2 2018 2:19PM
अश्या नराधमंबरोबर असच व्हायला पाहिजे...खरच कौतुकास्पद कृत्य आहे..  
  2     0
1000001713 ????? ?????   from  ????     May 2 2018 3:35PM
अगदी बरोबर केले त्या महिलेने प्रतेक बलात्कार करणाराला हिच शिक्षा झाली पाहिजे....उठता बसता त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली पाहिजे ती निर्दोष आहे.....  
  0     0
1000001712 Nilesh Mengade   from  Pune     May 2 2018 3:03PM
बरोबर केल  
  2     0
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000042