वारजे मध्ये पुन्हा एकदा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
Thursday, May 10 2018 8:54PM    CHECKMATE TIMES
Tags: sex racket, massage parlor, sex scandel, warje, malwadi, dnyanesh soc, warje crime, warje police 1000006700

मसाज सेंटरच्या नावाखाली चालू होता वेश्या व्यवसाय

 

पुणे, दि.१० (चेकमेट टाईम्स): वारजे मध्ये पुन्हा एकदा पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला असून, काही मुलींसह वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वारजे माळवाडी भागातील ज्ञानेश सोसायटी भागात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने आज गुरुवार (दि.१०) दुपारी चारच्या सुमारास व्यवसाय सुरु असलेल्या ठिकाणी धाड मारून, वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेसह दोन मुलींना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत पीटा कायद्यानुसार वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

 

काही महिन्यांपूर्वी वारजे हायवे चौकाजवळ अशाच प्रकारे मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे समोर आले होते. तर काही दिवसांपूर्वी उत्तमनगर भागात देखील सामाजिक सुरक्षा विभागाने धाड टाकून मुलींची सुटका केली होती. तर या पार्श्वभूमीवर बहुतांशी पकडली जाणारी वेश्याव्यवसाय प्रकरणे ही बाणेर, बावधन, मुंढवा, सिंहगड रस्ता, कोंढवा, हडपसर अशा उपनगर भागात आता वेश्याव्यवसाय जोर धरू लागला आहे का, असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

225   
3
प्रतिक्रिया
1000001715 sahebrao mahadeo taware   from  pune     May 11 2018 12:51AM
ज्या टायमाला laison dhile जाते तेंव्हा नियम ाटी सांगून वेळोवेळी चेकिंग केले पाहिजे  
  1     1
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 32,   Business Category: NA   Similar News ID: 1000000160