VIDEO राम नाम सत्य है, कार्पोरेशन सुस्त है !
Sunday, May 13 2018 6:44PM    CHECKMATE TIMES
Tags: funeral protest, protest against pmc, pune corporation, hadapasar, handewadi, kalepadal, resident protest, railway crossing 1000006702

मागण्यांसाठी हडपसर मध्ये आगळं वेगळं आंदोलन

 

पुणे, दि.१३ (चेकमेट टाईम्स): फोष फांउडेशन व हांडेवाडी रस्त्यावरील, काळेपडळ व ससाणेनगर मधील हौसिंग सोसायट्या व नागरीकांच्यावतीने रेल्वे क्रॉसिंग दरम्यान प्रतिकात्मक पूलाच्या शवाची अंतिम यात्रा, तिरडी मोर्चा काढण्यात आली. तसेच प्रतीकात्मक भूमिपूजन देखील करण्यात आले. यावेळी “राम नाम सत्य है, कार्पोरेशन सुस्त है I” अशा प्रकारच्या घोषणेसह महानगरपालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

 

रेल्वे क्रॉसिंग येथील वाहतूक कोंडी पासून सुटका व्हावी, सब वे लवकरात लवकर करण्यात यावा, जे काम ठरल्याप्रमाणे पुर्ण करण्यात यावे, अन्यथा महापालिकेस नागरिकांची दिशाभूल केली या कारणांमुळे दोषी ठरवण्यात यावे आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. तर पुणे महानगरपालिका कार्यकारी अभियंता प्रोजेक्ट डिपार्टमेंट प्रसून जोशी आणि विजय दाभाडे यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारले. यावेळी आंदोलकांच्या मागण्यांचा लवकरात लवकर विचार करून त्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. 

 

यावेळी वारंवार निवेदने देवूनही महापालिका प्रशासनाने कोणतीच कारवाई का केली नाही, असे म्हणत नागरिकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नागरिकांचा रुद्रावतार पाहून अधिकारी हतबल झाले. तर आंदोलनाबाबत लेखी आश्वासन द्या, अशी मागणी नागरिकांनी लावून धरल्याने तर अधिकाऱ्यांना बोलताच येत नव्हते. शेवटी कसेबसे वरिष्ठांच्या हातात अधिकार असल्याचे सांगून, लवकरात लवकर लेखी स्वरूपात आश्वासन देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी तिथून काढता पाय घेतला.

 

यावेळी बोलताना फोषचे अध्यक्ष वैभव माने म्हणाले की, नागरिक टॅक्स भरतात, त्यांना चांगल्या सेवा-सुविधा पालिकेने दयायला हव्यात, हे पालीकेचे प्रथम कर्तव्य आहे. बरेच वेळा भूमिपूजन होऊन सुद्धा ससाणेनगर रेल्वे क्रॉसिंग येथील पूलाचे काम होत नसल्याने नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र असे असताना देखील नागरिकांच्या अडचणींशी यांचा काही संबंध नसल्याप्रमाणे महापालिका व सत्ताधारी हातावर हात ठेवून बसले आहेत. मात्र आता समस्या न सुटल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा माने यांनी यावेळी दिला.

 

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजी ब्रिगेड, शिवप्रहार संघटना, सहजिवन जेष्ठ नागरिक मंच व मराठवाडा प्रतिष्ठान यांनी फोषच्या मोर्चाला लेखी पाठिंबा दिला व पुढील प्रत्येक आंदोलनात सक्रीय राहू असे देखील जाहीर केले. यावेळी विकास रैना, रशिद अत्तार, महेश पवार, अपेक्षा केळकर, प्रियंका शर्मा, रमजान शेख, मोहन गिनेलू, राजेश सोनाळेकर, ऋषिकेश निसाळ, मनिष डेंगळे, सोनल पंधी, सोनल लाडे, निलीमा मूनोत व परिसरातील महिला व नागरिक, तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चाचा शेवट तिरडी व पूलाच्या प्रतिकाला अग्नी देऊन करण्यात आला.

 


0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 23,   Business Category: NA   Similar News ID: 1000000063