VIDEO : वारजे माळवाडीत आगीचा भडका; भंगाराची गोदामे थोडक्यात वाचली
Tuesday, May 15 2018 2:22PM    CHECKMATE TIMES
Tags: FIRE, warje malwadi, godowns, industry fire, garbage godowns, wooden shops, warje police 1000006705

महानगरपालिकेची भंगारवाल्यांवर मेहेरनजर

राजरोस जाळला जातोय कचरा

 

पुणे, दि.१५ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी मधील सह्याद्री शाळेपासून रामनगर रस्त्यावर असलेल्या भंगाराच्या गोदामांच्या मागे असलेल्या कचऱ्याचा आज मोठ्या प्रमाणात भडका उडाला. सुदैवाने याबाबत अग्निशमन दलाला कळवण्यात आल्यानंतर दाखल झालेल्या अग्निशमन दलाने आग विझवली. दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, बदल्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र भंगार व्यावसायिकांनी त्यांना मदत केली नाही.

 

आज मंगळावर (दि.१५) सकाळी ९ च्या सुमारास लालाशेठ नामक भंगार व्यावसायिकाच्या भंगार गोदामांमागे टायर, वायर यांच्या आतील तांबे आणि लोखंडी तारा मिळवण्यासाठी कचरा पेटवण्यात आला होता. यामुळे आकाशात काळ्या रंगाच्या धुराचे लोट टायर झाले होते. यावेळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील बादल्यांनी पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र भंगार व्यावसायिकांनी त्यांना मदत केली नसल्याचे त्यांनी सांगितले. तर यावेळी जर आग आटोक्यात आली नसती, तर गोदामांचा भडका उडाला असता, अशी शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली. मात्र कचरा करणाऱ्यांनी कचऱ्याची आग विझवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत का केली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात गोदामांमागे भंगार कचरा टाकलाला असताना महानगरपालिकेने त्यांच्यावर सूचना देण्यापलीकडे काहीही केली नसल्याचे समोर आले आहे. तर इथे असलेल्या गोदामांपैकी तीन गोदामांमध्ये यापूर्वी आग लागल्याच्या घटना घडल्या असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले. तर असे असताना देखील यापैकी कोणत्याही गोदामामध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा नसल्याचा धक्कादायक खुलासा अग्निशमन जवानांनी केला.

 

तर या रस्त्यावर लाकडाच्या वखारी, रद्दी, पुठ्ठे आणि भंगारची गोदामे, गॅरेज अशा ज्वलनशील वस्तू असलेली अनधिकृत गोदामे आहेत. आपण या भागात नियमितपणे स्वच्छता करत असतो. तसेच कचरा टाकू नका अशा सूचना गोदाम चालकांना देण्यात आल्या असल्याचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितले. एकूणच मोठ्या प्रमाणात भंगाराची गोदामे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करत असताना, त्यांच्या अरेरावीला कोणाचा पाठींबा आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. तर जीवितहानी झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

 


0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 32,   Business Category: NA   Similar News ID: 1000000038