ना २०१९, ना २०२२ - आता थेट महासत्ता २०३५
Wednesday, May 23 2018 4:18PM    CHECKMATE TIMES
Tags: mahasatta 2035, election 2019, election 2022, upcoming election, new marathi movie, marathi movie on politics 1000006706

पुणे, दि.१५ (चेकमेट टाईम्स): आपल्या देशाला स्वात्यंत्र मिळून ७० वर्षे झाली तरी अजून पर्यंत भारताची म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. इंग्रज देश सोडून गेल्यानंतर 'आपल्या' लोकांच्या हातात सत्ता आली. परंतु बहुसंख्य सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा दुरुपयोग करत स्वतःचीच तुंबडी भरली आणि सामान्य जनतेला सोयी सुविधांपासून वंचित ठेवले. राजकारणी गब्बर होत गेले आणि जनता गरीब. 'गरिबी हटाव' सारखे 'नारे' फक्त कागदी घोषणाच राहिल्या.

 

खरंतर जनतेच्या मूलभूत गरजा भागवणं हे कुठल्याही सरकारची जबाबदारीच आहे. परंतु याबद्दल सामान्य जनता अनभिज्ञ राहिल्यामुळे भ्रष्ट राजकारण्यांचे फावले आणि कुवत असूनही आपला देश जागतिक महासत्ता बनण्याच्या जवळपासही पोहोचला नाही. याच गोष्टीची सल आणि चीड लेखक दिग्दर्शक रामप्रभू नकाते यांनी आपला पर्दापनीय चित्रपट 'महासत्ता २०३५' मधून व्यक्त केली आहे.

 

लवकरच येऊ घातलेला 'महासत्ता २०३५' हा चित्रपट १९९० ते २०३५ या कालखंडात घडणारा आहे. त्यामुळे वास्तविकतेबरोबर साहजिकच 'फँटसी' आलीच. परंतु चित्रपट पाहिल्यावर ही 'फँटसी' वास्तवात उतरावी, असे प्रत्येक प्रेक्षकाला वाटेल. 'महासत्ता २०३५' हा चित्रपट राजकारणावर व देशावर आधारित चित्रपट आहे. सध्याचे राजकारण कसे गढूळ, स्वार्थी व बरबटलेले असून देशाची प्रगती आमुलाग्र पद्धतीने होण्यासाठी राजकारणात काय बदल झाले पाहिजेत, ते या चित्रपटात दाखविले आहे.

 

जागतिक स्पर्धेत आपला देश महासत्ता होण्यासाठी आपण काय बदल केले पाहिजेत त्यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटातील नायकाचा अखंड प्रवास व त्याला वेळोवेळी आलेले अडथळे, सिस्टीममधील दोष, भ्रष्टाचारासाठी सरकारी बाबूंनी केलेली हिडीस-फिडीस वागणूक व यातूनच देशाला महासत्ता बनविण्याचा नायकाचा निर्धार यातून ही कथा वळणं घेत प्रवास करते. राजकारण व राजकीय डावपेच, सत्तेची नशा, निवडणुकीतील रॅलीज, प्रचारसभा, सत्ताकारणातील रस्सीखेच, आमदारांची फोडाफोडी व  नायकाची सामाजिक प्रगतीची धडपड यामुळे चित्रपट रक्तरंजित बनतो.

 

या चित्रपटात नायकाचा प्रवास, जिद्द, चिकाटी व निर्धार, त्याच्या आधुनिक तंत्रज्ञान पद्धती व देशासाठीची तळमळ यामुळे जागतिक महासत्ता झालेला भारत पहाण्यासाठी हा चित्रपट जरूर पहा. 'महासत्ता २०३५' मध्ये कथा, दिग्दर्शक रामप्रभू नकाते अभिनय पदार्पणही करीत असून, त्यांच्या सोबत उषा नाईक, नागेश भोसले, भारत गणेशपुरे, किशोर महाबोले, प्रकाश धोत्रे, रणजित रणदिवे, निशा परुळेकर, सुरेखा कुडची, रोहित चव्हाण आणि नूतन जयंत यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचं संगीत नियोजन केलंय धनंजय धुमाळ आणि चंद्रमोहन यांनी. पटकथा व संवाद हे निशिकांत रावजी व रामप्रभू नकाते यांनी लिहिलेत.

भारताला जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगलेला चित्रपट 'महासत्ता २०३५' हा चित्रपट येत्या १८ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. सदर चित्रपटाला ५२ जागतिक पातळीवर चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Entertainment,   Business Category: NA   Similar News ID: 1000000015