मुळशीत पावसाळ्यात स्वर्ग अवतरतो : सिने अभिनेता प्रवीण तरडे
Tuesday, May 15 2018 7:52PM    CHECKMATE TIMES
Tags: shambhu jayanti, falicitate to great workers, sportsman, moraya mitra mandal, sambhaji maharaj jayanti 1000006707

पुणे, दि.१५ (चेकमेट टाईम्स): मुळशी मध्ये पावसाळ्याच्या दिवसांत अक्षरशः स्वर्ग अवतरतो. अशा भागात जन्म घेतल्याचा अभिमान आहे. मात्र याचा अनुभव “याची देही, याची डोळा” देशभरातील जनतेने घ्यावा असे आवाहन मराठी सिने अभिनेता प्रवीण तरडे यांनी केले आहे.

 

कर्वेनगर मधील मोरया मित्र मंडळ आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ अध्यक्ष विजय पारगे, खारवडे म्हसोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्षा मधुरा भेलके, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष प्रदिप धुमाळ, विजय डाकले, अनिल मारणे, वसंत मारणे, महेश पवळे, आनंद तांबे, सचिन कांबळे, चंद्रशेखर देशमुख, मंगेश नवघणे, विकी नामुगडे, विनायक भरम, अंनता केंडे, सागर फाटक, सचिन कुलकर्णी यांच्यासह राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

 

यावेळी पुढे बोलणं तरडे म्हणाले, जन्म घेतलेल्या तालुक्याचे आमच्यावर अनंत ऋण आहेत. ते फेडण्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून “मुळशी पॅटर्न” नावाचा सिनेमा काढून संपूर्ण देशभर तालुक्याचे नाव प्रसिध्द करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तरडे यांनी बोलून दाखवले. यावेळी शंभू व्याख्याते प्रा.पराशर मोने यांच्या व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले होते. जंयती उत्सवाची सुरुवात प्रसिध्द उद्योजक सुनिल मारणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुर्तीला पुष्पहार घालून, प्रेरणा मंत्र शंभूगीत गाऊन करण्यात आली.

 

यावेळी पॉवर वेट लिफ्टिंग आंतराष्ट्रीय ऐशियाई स्पर्धा मध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या देवेंद्र खुळे, छत्रपती पुरस्कार विजेते लाला भिलारे, छत्रपती पुरस्कार विजेत्या कोमल पाठारे (घारे) आणि ऐश्वर्या रावडे तसेच पोलिस आधिकारी निवृत्ती ऊभे या सर्वांचा उल्लेखनीय कार्याबद्दल छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील पुस्तक आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

 

कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे संस्थापक केदार मारणे यांनी केले होते. सुत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक बाळकृष्ण नेहरकर यांनी, तर मंडळाचे अध्यक्ष गणेश गायकवाड़ यांनी उपस्थितांचे आभार मानले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 31,   Business Category: NA   Similar News ID: 1000000089