बराटेंच्या घरात घरफोडी; चोरट्याने लांबवला साडेसहा लाखांचा ऐवज
Thursday, May 17 2018 4:58PM    CHECKMATE TIMES
Tags: thief, warje, barate house, robbery, warje gaon, nanashree, house breking, theft of jewellery 1000006710

भर दुपारी कुलूप तोडून चोरीचा प्रकार

 

पुणे, दि.१७ (चेकमेट टाईम्स): सिंहगड रस्त्यावरील भाजपा नगरसेविका ज्योती गोसावी यांच्या घरात झालेल्या चोरीचे प्रकरण ताजे असतानाच, वारजे मधील बराटेंच्या घरी चोरट्याने हात साफ करत तब्बल ६ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तर बराटे यांच्या घरात चोरी होते, तर सामन्यांची घरे किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय छबू बराटे (वय.३९ रा.वारजे गाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

 

काल बुधवार (दि.१६) सकाळी अकरा ते दुपारी दीडच्या दरम्यान दत्तात्रय बराटे यांच्या वारजे गावठाण येथील नानाश्री इमारतीमधील घरी कोणीही नसताना, घर कुलुपबंद असताना, अज्ञात चोरट्याने कुलूप तोडत घरात प्रवेश करून, बेडरूम मध्ये असलेल्या लाकडी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे एकूण ६ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच बराटे यांनी तत्काळ पोलिसांना कळवून तक्रार दिली.

 

बराटे यांच्या घरात चोरी झाल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, परिस्थितीची पाहणी केली. तर एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस वारजे गावात आल्याने बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर वारजे गावठाण सारख्या ठिकाणी आणि ते देखील बराटे यांच्या घरात चोरी झाल्याने, सामन्यांची घरे कितपत सुरक्षित आहेत, अशा चर्चा नागरिक करू लागले आहेत. वारजे पोलीस तपास करत आहेत.

9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 32,   Business Category: NA   Similar News ID: 1000000142