बावधन मध्ये पती पत्नीच्या भांडणात मेहुणीचा बळी
Friday, May 18 2018 11:18AM    CHECKMATE TIMES
Tags: murder, murder of Sister-in-law, murder in bavdhan, hinjewadi police, husbund wife 1000006711

भांडण सोडवण्यास गेलेल्या मेहुणीचाच खून

 

पुणे, दि.१७ (चेकमेट टाईम्स): पती पत्नीची घरगुती भांडणे सोडवण्यास गेलेल्या मेहुणीला प्राणाला मुकावे लागले आहे. ही घटना पुण्याचे पश्चिम प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकाजवळ बावधन हद्दीमध्ये घडली. याबाबत हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्नीबाई देवा जाधव (वय. २५, रा. भूंडे वस्ती, बावधन, पुणे) असे मध्यस्थी करताना मृत्युमुखी पडलेल्या मेहुणीचे नाव आहे. तर दाजी हिरा देवू चव्हाण (३०, रा. पाषाण, पुणे) आणि एका अल्पवयीन मुलाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी देवा खेमू जाधव (३०, रा. बावधन, पुणे) याने हिंजवडी पोलिसात तक्रार दिली आहे.

 

काल गुरुवार (दि.१६) रात्री देवू चव्हाण घरगुती वादातुन पत्नीला मारहाण करत होता. यावेळी मुन्नीबाई भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असताना, देवू चव्हाण आणि एका अल्पवयीन मुलाने मुन्नीबाईच्या डोक्यात चूल फुंकण्याची फुंकणी मारून खून केला. तर देवू चव्हाणची पत्नी जखमी झाली आहे. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 10,   Business Category: NA   Similar News ID: 1000000045