भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांनी संभाजी महाराज जयंती साजरी
Friday, May 18 2018 11:59AM    CHECKMATE TIMES
Tags: SAMBHAJI MAHARAJ JAYANTI, ramesh wanjale pratishthan, fort savings moments, warje 1000006712

पुणे, दि.१७ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी मधील स्व. आमदार रमेशभाऊ वांजळे प्रतिष्ठाण आणि गड संवर्धन मोहीमच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 

संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन सामाजिक कार्यकर्ते संजय दोडके, राजाभाऊ जोशी सुरेश जोशी, चंद्रशेखर देशमुख, विक्रम परदेशी, हमीद शेख यांच्या हस्ते करण्यात आले. तर नगरसेवक सचिन दोडके, सायली वांजळे, चंद्रकांत पंडित, नाना सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. सांयकाळी शालेय विद्यार्थ्यांच्या पोवाड्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतिकारकांच्या जीवनावरील माहिती फलक कार्यक्रमस्थळी लावण्यात आले होते. इतर मंडळांच्या वतीने काढण्यात आलेल्या शंभू राजांच्या मिरवणुकी आणि पालख्यांचे स्वागत करत एकीचे बाळ वाढवण्याचा कौतुअकस्पद प्रयत्न प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. सामुहिक महाशिववंदना व आरतीने तर वातावरणात चैतन्य निर्माण केले होते.

 

स्व. आमदार रमेशभाऊ वांजळे प्रतिष्ठाणच्या वतीने किल्ले सिंहगड वरती संवर्धनाच्या कामाबरोबर यंदाच्या वर्षी प्रथमच वारजे माळवाडी येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला. अयोजन प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ जोशी यांच्यासह रोहन पवार, माऊली रायरीकर, सागर शेडगे, दिपक कदम, अभिजित टकले, अक्षय निवंगुणे आदींनी केले होते.

 

 

9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 32,   Business Category: NA   Similar News ID: 1000000089