वारजे गाड्यांच्या काचा फोडल्याप्रकरणी दोघे ताब्यात
Friday, May 18 2018 11:19PM    CHECKMATE TIMES
Tags: WARJE, GLASS BREAKING, CRIME, WARJE POLICE 1000006713
गाड्या फोडण्याचे कारण अचंबित करणारे

पुणे, दि.१८ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी रामनगर रस्त्यावर गुरुवार (दि.१७) पहाटे रस्त्याच्या कडेला लावलेल्या चारचाकी मोटारी मोटारी फोडल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न आणि समारंभांमध्ये वाढप्याचे काम करणाऱ्या या दोघा संशयितांकडे त्यांच्याच दोन सहकाऱ्यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. ते दिले नसता, त्यांची भांडणे झाली. त्यातून त्या दोघांनी यांना दगड फेकून मारले असता, प्रतीउत्तरादाखल यांनी केलेल्या दगडफेकीत त्या मोटारींच्या काचा फुटल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे गुन्हे प्रकटीकरण शाखेने कालपासून आपल्या खबऱ्याना कामाला लावून माहिती मिळवत, संबंधित दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे. मात्र दोघेही अल्पवयीन असल्याचे समोर आले असून, किरकोळ वादातून गाड्यांच्या काचा फुटल्याचे निष्पन्न झाले आहे.

सह्याद्री शाळेपासून वारजे रामनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर, दत्तनगर, युवराज कॉर्नर येथे लावण्यात आलेल्या मोटारींच्या काचा दगड मारून फोडल्याचे काल गुरुवार (दि.१७) समोर आले होते. याबाबत गणपत दादा घोडके (वय.३० रा.वारजे, पुणे) यांनी वारजे पोलिसात तक्रार दिली होती. तर स्विफ्ट डिझायर क्र. एमएच १२ केएन ७२४८, मारुती इको मोटार क्र. एमएच १२ केएल ४७२७, इंडिका व्हिस्टा मोटार क्र. एमएच १२ केएल २७३०, मिनी बस क्र. एमएच १२ एनएक्स ८३२६ आणि टेम्पो क्र. एमएच ०४ सीई ५८२६ या वाहनांचे नुकसान झाले होते.
  
(आमच्या व्हिडीओ न्यूज सर्वात अगोदर पाहण्यासाठी व्हिडीओ मध्ये लाल रंगात दिसत असलेले SUBSCRIBE बटन क्लिक करा. यावेळी बाजूला असलेल्या बेल’च्या बटनावर क्लिक करायला विसरू नका.)
18   
1
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 32,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004