राजेंद्र थोरात यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार जाहीर
Friday, May 25 2018 8:10PM    CHECKMATE TIMES
Tags: maharashtra sahitya parishad, rajendra thorat, ashutosh kasbekar, sahityakrutiche madhymantar, sanskar mandir college warje malwadi, pratibha rai, nagraj manjule, dilip barate, 1000006714

संस्कार मंदिर महाविद्यालय वारजे - माळवाडी येथील मराठी विभाग प्रमुख

 

पुणे दि.२३ (चेकमेट टाईम्स): प्रा. डॉ. राजेंद्र थोरात व प्रा. आशुतोष कसबेकर यांच्या 'साहित्यकृतीचे माध्यमांतर' या संपादित ग्रंथाला 'महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे' यांच्या वतीने दिला जाणारा 'माधुरी वैद्य पुरस्कृत श्रीवत्स प्रकाशन (संपादित ग्रंथ) पारितोषिक' जाहीर झाले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमाणपत्र आणि रोख रूपये ५०००/- असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

सदर पारितोषिक वितरण समारंभ शनिवार (दि. २६ मे) रोजी एस. एम. जोशी सभागृह, पुणे येथे संपन्न होणार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध उडिया लेखिका प्रतिभा राय यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

 

'साहित्यकृतीचे माध्यमांतर' या ग्रंथाला 'सैराट' चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची मौलिक प्रस्तावना लाभलेली असून, हे पुस्तक डॉ. राजेंद्र थोरात यांनी जेष्ठ दिग्दर्शक मा. जब्बार पटेल यांना आदरपूर्वक अर्पण केले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्कार मंदिर संस्थेचे अध्यक्ष दिलीप बराटे, संस्थेचे सचिव विशाल थोरात, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप भोईटे तसेच महाविद्यालयतील प्राध्यापकवृंद व विद्यार्थी यांनी आनंद व्यक्त केला.खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.

 
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Sahitya,   Business Category: NA   Similar News ID: 1000000079