'बकेट लिस्ट' च्या प्री - बुकींगला जोरदार प्रतिसाद
Friday, May 25 2018 8:04PM    CHECKMATE TIMES
Tags: bucket list marathi movie, new marathi movie bucket list, bucket list advance booking, bucket list pre booking, madhuri dixit, upcoming marathi movies, sumit raghvan, renuka shahane, 1000006715

पुणे दि.२३ (चेकमेट टाईम्स): धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे 'बकेट लिस्ट' चित्रपटाच्या  निमित्ताने मराठीत पदार्पण होत आहे. या नव्या प्रवासात तिची सोबत करायला अवघा महाराष्ट्र आतूर आहे. कधी एकदा आपण आपल्या लाडक्या हास्यसम्राज्ञीचे मराठमोळे स्वरूप मोठ्या पडद्यावर पाहतो यासाठी प्रेक्षकांमध्ये भलतीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. याच उत्सुकतेपोटी होणाऱ्या तिकीट विक्रीच्या विचारणेला दाद देत महाराष्ट्रातल्या काही सिनेमागृहांनी प्री - बुकींग सुरू केले असून, प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

 

याविषयी विचारणा केली असता, 'सिटी प्राईड' चे मॅनेजर सुगत थोरात म्हणालेमाधुरीचा हा पहिलाच सिनेमा, त्यात 'बकेट लिस्ट' या नावात नेमके काय दडले आहे याबाबत प्रेक्षकांची असणारी उत्सुकता, यामुळे प्रेक्षकांचे बुकींगसाठी सतत फोन येत असल्याचे म्हणत या सिनेप्रेमींच्या आग्रहाखातर आपण पहिल्यांदाच बुधवार ऐवजी सोमवारपासूनच तिकीट विक्री सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान आपण घेतलेल्या या पुढाकाराला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले असून, जोरदार तिकीट बुकिंग सुरू आहे."

 

प्री - बुकींग ला चांगलाच प्रतिसाद मिळणाऱ्या 'बकेट लिस्ट' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले आहे, तर या कथेचे सहलेखन देवश्री शिवडेकर यांनी केले आहे. डार्क हॉर्स सिनेमाज्, दार मोशन पिक्चर्स, ब्लू मस्टँग क्रिएशन्स निर्मित 'बकेट लिस्ट' या चित्रपटाची निर्मिती जमाश बापुना, अमित पंकज परिख, अरूण रंगाचारी, विवेक रंगाचारी, आरती सुभेदार आणि अशोक सुभेदार यांनी केली आहे. तर करण जोहर आणि ए. ए. फिल्म्स हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसमोर सादर करीत आहेत.

 

या चित्रपटात माधुरीबरोबरच सुमित राघवन, रेणुका शहाणे, वंदना गुप्ते, प्रदीप वेलणकर, शुभा खोटे, दिलीप प्रभावळकर, इला भाटे, मिलिंद फाटक ही

कलाकार मंडळी आपल्याला दिसणार आहे.

 

या सगळ्याचे कलाकारांचा अप्रतिम अभिनय, जगण्याचा अर्थ नव्याने समजावून सांगणारी रोचक कथा आणि माधुरीचा मराठीबाणा अनुभवण्यासाठी तुम्हीही लगेचच आपले तिकीट बुक करा.


खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Entertainment,   Business Category: NA   Similar News ID: 1000000015