महाराष्ट्र औद्योगिक व आर्थिक विकास परिषदे चे आयोजन
Friday, May 25 2018 7:57PM    CHECKMATE TIMES
Tags: vivek yuva manch, vivek yuva manch pune, vivek yuva manch parishad, program by vivek yuva manch, santosh kapatkar 1000006717

'विवेक युवा मंच' चा स्तुत्य उपक्रम

 

पुणे दि.२५ (चेकमेट टाईम्स): पुण्यातील 'विवेक युवा मंच' हा सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरुपाच्या उद्योजकांना येणाऱ्या आर्थिक आणि अन्य समस्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने स्थापन केला गेला असून गेली अनेक वर्षे सातत्याने या संस्थेद्वारे छोट्या व्यावसायिकांना  येणाऱ्या समस्यांचे निवारण केले जाते. मंचातर्फे २७ मे रोजी औद्योगिक व आर्थिक विकास परिषदे चे आयोजन करण्यात आले आहे.

 

सध्याची आर्थिक परिस्थिती आणि बँकांचे असहकार्य या मुळे सर्व स्तरातील व्यावसायिकांना  बरेच प्रश्न भेडसावत आहेत. उद्योजकांना येणाऱ्या आर्थिक / बँका बाबत च्या समस्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने 'विवेक युवा मंच' तर्फे दर वर्षी राज्यव्यापी संमेलन आयोजित करण्यात येते. या वर्षी स्नेहसदन सभागृह, मॅजेस्टिक बुक डेपो समोर, शनिवार पेठ येथे हे संमेलन होणार आहे.

 

रविवार (दि २७ मे) रोजी दुपारी ३ ते ६ या वेळे हे संमेलन होणार असल्याचे मंचा चे संस्थापक संतोष कपटकर यांनी सांगितले आहे. या परिषदे मध्ये बँकांचे अधिकारी / प्रतिनिधी तसेच उद्योजक एकाच व्यासपीठावर येणार असून, आर्थिक समस्यांवर बँका आणि उद्योजक आपापली बाजू मांडणार आहेत.

 

या परिषदेतील चर्चे अजित नाथ झा (सीडबी), कार्तिक (आर बी आय ), ओ. पी. श्रीवास्तव (सी  बी आय, डि जि एम), सचिन  गुप्ता (यूनियन बँक), सूर्यकांत पाठक (ग्राहक मंच ), सुरेश कोते  (द्योजक), संजय कदम (द्योजक), मिलिंद जोशीराव (द्योजक) सहभागी होणार आहेत. ही परिषद उद्योजक तसेच औद्योगिक क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी खुली आणि विनामूल्य आहे.


खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
0   
0
प्रतिक्रिया
1000001723 Designer Mrs Aparnaamol Bakshi   from  Pune     May 26 2018 6:23PM
Interested in participating  
  1     0
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Business,   Business Category: NA   Similar News ID: 1000000000