जलतरण तलाव व्यवस्थापक आणि लाईफ गार्ड विरुद्ध गुन्हा दाखल
Friday, May 25 2018 7:49PM    CHECKMATE TIMES
Tags: drown death in pune, drown death in swimming tank, airport police station, avinash pandurang shivcharan, shekhar malhari, hariprasad premsingh bhandari, 1000006720

पुणे दि.२५ (चेकमेट टाईम्स): नुकत्याच घडलेल्या एका घटनेत जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी जलतरण तलावाचा व्यवस्थापक आणि लाईफ गार्ड विरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ मे रोजी खराडी बायपास येथील काव्या जलतरण तलावात घडली होती.

 

याबाबत सूत्रांनी दिलेली माहितीनुसार, अविनाश पांडुरंग शिवचरण (वय ३१, रा. समता सोसायटी, वडगाव शेरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर जलतरण तलावाचा व्यवस्थापक शेखर मल्हारी आणि लाईफ गार्ड हरिप्रसाद प्रेमसिंग भंडारी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस फौजदार एम. जी. सासवडे यांनी फिर्य़ाद दिली आहे.

 

अविनाश शिवचरण हा १५ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास खराडी बायबास येथील काव्या जलतरण तलावात पोहायला गेला होता. त्यावेळी व्यवस्थापक शेखर आणि लाईफ गार्ड भंडारी यांना अविनाशला पोहता येत नसल्याचे सांगण्यात आले होते. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. अविनाश पाण्यात पोहण्यासाठी उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. शेखर आणि भंडारी यांच्या निष्काळजीपणामुळे अविनाशचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए. एम. आठर करीत आहेत.


खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
 
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 4,   Business Category: NA   Similar News ID: 1000000048