टोळक्याकडून 'वारजे माळवाडी' पोलीस स्टेशन मध्ये तोडफोड
Friday, May 25 2018 7:12PM    CHECKMATE TIMES
Tags: police station vandalise by gang, police station vandalise in pune, police station vandalise in in warje malwadi, warje malwadi gang war, gang vandalised police station 1000006721

गुन्हेगारांकडून थेट पोलीस यंत्रणेलाच आव्हान


पुणे दि.२५ (चेकमेट टाईम्स): पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गेले असात, पोलीस कर्मचारी हजर नसल्याच्या कारणावरुन वारजे माळवाडी भागात एका टोळक्याने पोलीस स्टेशनचीच तोडफोड केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. वर्चस्व वादातून मारहाण झाल्यानंतर दुसरा गट तक्रार देण्यास वारजे येथील रामनगर पोलिस चौकीत गेला होता. मात्र, त्या ठिकाणी कोणी हजर नसल्याने या गटाने पोलीस स्टेशन मधील काचा आणि टेबलाची तोडफोड केली.

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी येथील रामनगर परिसर सतत अशांत असतो. या भागात दोन टोळ्यांच्या वर्चस्व वादाच्या लढाईतून सतत दहशतीचे वातावरण निर्मा होत आहे. अनेकदा किरकोळ वादातून टोळक्याकडून पार्किंग मध्ये उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड केली जाते, तसेच दहशत माजविण्याचा प्रयत्न केला जातो. सतत घडणाऱ्या या घटनांचा प्रत्यक्ष फटका आता थेट पोलिसांना बसला आहे.

 

बुधवार (दि.२३) रोजी रामनगर परिसरात एका गटाने दोन तरुणांना मारहाण केली होती. त्यानंतर मारहाण करण्यात आलेला दुसरा गट याबाबत तक्रार देण्यासाठी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन मध्ये गेला होता. मात्र, चौकीत कोणीही नसल्याने संतापलेल्या तरुणांनी पोलीस स्टेशन मधील काचा फोडल्या, त्याचबरोबर टेबलाची देखील तोडफोड करण्यात आली.खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 32,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004