VIDEO : कर्वेनगर उड्डाणपुलाची कुरबुर चालू; पथदिवे बंद पडल्याने अपघाताचा धोका
Friday, May 25 2018 7:06PM    CHECKMATE TIMES
Tags: karvenagar flyover, karvenagar bridge, karvenagar flyover street lights off, problems of karvenagar flyover, obstacles of karvenagar flyover, 1000006722

पुणे, दि.२५ (चेकमेट टाईम्स): श्रेयवादाच्या लढाईत उद्घाटन झालेल्या कर्वेनगर उड्डाणपुलाच्या कुरबुरींना सुरवात झाली आहे. १७ फेब्रुवारी २०१७ रोजी उद्घाटन झालेल्या आणि उद्घाटनाच्या दिवसांचे शतक पूर्ण होण्याअगोदरच पुलावरील पथदिवे बंद पडले आहेत. त्यामुळे पुलाच्या वर्षभराचा कारभार कसा असेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत बोलताना ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी राजेंद्र वाघ यांनी पुलावरील पथदिवे तातडीने सुरु करण्याची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी युवकचे शहर उपाध्यक्ष पराग ढेणे यांनी आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका असा सूचक इशारा दिला आहे.

 

कर्वेनगर उड्डाणपूल वेळेत पूर्ण करण्यात महानगर पालिकेला अपयश आले होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनावर प्रचंड टीका करण्यात आली होती. अखेर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. दरम्यान पुलाच्या उदघाटनावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी ठेकेदार आणि महानगर पालिका अधिकाऱ्यांनी काम वेळेत केले नसले तरी, चांगले केले असल्याची पावती अगोदरच दिली होती.

 

गिरीश बापट यांनी वाहतुकीची कोंडी सुटल्याचा आनंद व्यक्त केला होता आणि या पुलावरून जाणारा प्रत्येक माणूस हा आपला वेळ वाचला आणि सुरक्षित जाता आले, म्हणून मनापासून खुश असेल. सामान्य माणसाच्या खुशीतच आम्ही खुश आहोत असे देखील बापट म्हणाले होते. परंतु, पुलाच्या उद्घाटनाला शंभर दिवस पूर्ण होण्यापूर्वीच पुलावरील दिवे बंद पडले असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.


खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 31,   Business Category: NA   Similar News ID: 1000000156