बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी चांदणी चौकात एकाला अटक
Saturday, May 26 2018 1:21PM    CHECKMATE TIMES
Tags: one arrested for illegal pistol, one arrested in chandani chowk, arrest for illegal pistol in pune, kush nandkumar pawar, pune crime branch, ajay uttekar, kothrud police station, 1000006723

पुणे गुन्हे शाखेची कारवाई

 

पुणे दि.२६ (चेकमेट टाईम्स): बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या गुंडा स्कॉडने एकाला अटक केली आहे. चांदणी चौकात अटक करण्यात आलेल्या या संशयित गुन्हेगाराकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. कुश नंदकुमार पवार (वय २७, रा. कमल आर्केड, शाळा चौक, तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या संशयित गुन्हेगाराचे नाव आहे.

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय उत्तेकर यांनी याप्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती. पुणे शहर गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक राम राजमाने यांना कुशबाबत गुप्तहेराकडून माहिती मिळाली होती. माहितीची खात्री पटल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चांदणी चौक येथे सापळा रचला कुश याला ताब्यात घेतले. त्यानंतर केलेल्या तपासणीत त्याच्याकडे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळले.

 

ही कामगिरी गुंडा स्कॉड दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंग चौहान, प्रवीण पडवळ, कैलास साळुंके, संजय बरकडे, सुनील चिखले, प्रशांत पवार, विवेक जाधव आणि चालक संभाजी गंगावणे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली.


खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. 
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 10,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004