वारजेतील एकाला नवीन हॉटेलचे बिल पडले सव्वादोन लाख रुपये
Saturday, May 26 2018 8:18PM    CHECKMATE TIMES
Tags: warje, karvenagar, kakade plaza, new hotel, warje police, bill of rupees 2 lacs, thief 1000006728

चव चाखायला गेलेल्या खवय्याला भुर्दंड

 

पुणे, दि.२६ (चेकमेट टाईम्स): कर्वेनगर मधील काकडे प्लाझा जवळ नव्याने झालेल्या एका हॉटेल मध्ये चव चाखायला गेलेल्या एका खवय्याला तब्बल सव्वा दोन लाखांचा भुर्दंड बसला असल्याची घटना समोर आली आहे. याबाबत वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गेश ठाकूर (वय २२, रा.दांगट पाटीलनगर, शिवणे पुणे) यांनी वारजे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दुर्गेश ठाकूर हा आपल्या वडिलांसमवेत काल शुक्रवार (दि.२५) दुपारी दोनच्या सुमारास काकडे प्लाझा येथील बँक ऑफ बडोदा समोर गेला होता. यावेळी तेथे झालेल्या एका नवीन हॉटेल मधील पदार्थांची चव चाखण्यासाठी वडील आणि मुलगा गेले असता, अज्ञात चोरट्याने त्यांच्या अॅक्टीव्हा स्कूटरची डिकी उघडून त्यातील २ लाख २० हजार रुपयांची रोकड आणि बँकेचे पासबुक चोरून नेले.

 

हॉटेल मधून आल्यानंतर त्यांना गाडीची डिकी उघडी असलेली दिसली. यावेळी त्यांनी लगेचच डिकीत रक्कम आहे का पहिले असता, त्यात ती नसल्याचे आढळून आले. यावेळी ठाकूर यांनी तातडीने वारजे पोलिसांना संपर्क्कार्त घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. यावेळी भरदुपारी आणि रहदारीच्या रस्त्यावर चोरी झाल्याने पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केला आहे. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके करत आहेत.

 

खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
18   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 31,   Business Category: NA   Similar News ID: 1000000142