कोथरूड मध्ये रक्तचंदन तस्कर पकडला; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त
Sunday, May 27 2018 6:12PM    CHECKMATE TIMES
Tags: smuggling, smugglers racket, blood sandal, kothrud, paud road, bhugaon, crime branch 1000006729

पुणे, दि.२७ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरात विविध प्रकारच्या बंदी असलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात तस्कारी होत असताना, काही तस्कर पोलिसांच्या हाती लागत आहेत. असाच एक तस्कर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ च्या हाती लागला असून, त्याच्याकडून तब्बल ५९ किलो रक्तचंदनाचा साठा आणि मोटार असा ५ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल हरिदास इंगळे (वय.३०, रा. भुगाव, पुणे) असे अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे.

 

गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलिस हवालदार रिजवान जिनेडी, पोलिस नाईक सचिन जाधव, इरफान मोमीन, सुधाकर माने आणि खडके हे कोथरूड परिसरात खासगी वाहनाने गस्त घालत असताना, पोलिस नाईक सचिन जाधव आणि इरफान मोमीन यांना त्यांच्या खबऱ्याने कोथरूड परिसरातील वनाज कंपनीजवळ एक लाल रंगाची हुंडा आय १० मोटार उभी असून, त्यामध्ये रक्तचंदन असल्याची माहिती दिली.

 

यावेळी मिळालेल्या माहितीबाबत गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन भोसले पाटील, पोलिस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलिस हवालदार रिजवान जिनेडी, पोलिस नाईक सचिन जाधव, इरफान मोमीन, सुधाकर माने आणि खडके यांनी कोथरूड पोलीस स्टेशन पासून जवळच असलेल्या पौड रस्त्यावरील वनाज कंपनी जवळील, माहिती मिळालेल्या ठिकाणी धाव घेत, सापळा रचून स्टार फर्निचर जवळ, थांबलेल्या आणि माहिती मिळालेल्या वर्णनाच्या हुंडाई आय १० मोटार क्र. एमएच १३ एसी २९९७ चालकाकडे संशयित म्हणून चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

 

यावेळी त्याला मोटारीची डिकी उघडण्यास सांगितले असता, तो गाडीतून उतरत नसल्याने संशय बळावल्याने, त्याला पोलिसी खाक्या दाखवून, गाडीतून उतरण्यास सांगत, डिकी उघडली असता, डिकीमध्ये कागदाने गुंडाळून, त्याला खाकी टेपने सील केलेल्या अवस्थेतील वस्तू दिसल्या. त्या उघडल्या असता, ते रक्तचंदनाचे ५९ किलो वजनाचे १० ओंडके आढळून आले. पोलिसांनी रक्तचंदन आणि इतर माल असा एकूण ५ लाख ६० हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे.

 

जप्त करण्यात आलेले रक्तचंदन हे हैद्राबाद येथून श्रीनिवास नामक व्यक्तीने दिल्याचे राहू इंगळे याने पोलिसांना प्राथमिक चौकशीत सांगितले असून, सदरील गुन्ह्यात वापरलेली मोटार त्याच्या वडिलांच्या नावावर असल्याचे त्याने सांगितले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक इरफान मोमीन यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

 

खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.


 
9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 10,   Business Category: NA   Similar News ID: 1000000140