खडकवासला धरणात पोहायला गेलेला तरुण शेवाळात अडकून मृत्युमुखी
Monday, May 28 2018 10:30AM    CHECKMATE TIMES
Tags: Swimmer died in khadakwasla, youngster drawn on khadakwasla, khadakwasla lake, haveli police 1000006731
पुणे, दि. २७ (चेकमेट टाईम्स): खडकवासला धरणावर पर्यटनासाठी आलेल्या तरुणांपैकी एक तरुण आगळंबे गावाजवळील एलिना फार्म जवळ धरण क्षेत्रात बुडाला. खोल पाण्यातील शेवाळात अडकल्याने त्याला पाण्यात हालचाल करता आली नसावी आणि त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश बोडके (वय.२८ सद्या रा.न्यू अहिरेगाव, मूळ - ता.पैठण, जि. औरंगाबाद) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून, तो आपल्या भावाकडे उन्हाळी सुट्ट्यांसाठी आला होता.

दरम्यान, आज रविवार (दि.२७) मयत गणेश आपला भाऊ आणि मित्रांसोबत खडकवासला धरण क्षेत्रात फिरायला गेले होते. खडकवासला चौपाटी भागात पोहण्यास मनाई असल्याने, ते आगळंबे भागातील एलिना फार्म येथील धरण क्षेत्रात पोहत असताना, खोल पाण्यात गेलेल्या गणेश अचानक गायब झाला.

काही वेळात मित्रांच्या हे लक्षात आल्यानंतर सर्वानी शोधाशोध सुरु केली. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने पाण्यात गणेशचा शोध सुरू केला. सायंकाळी ६ च्या सुमारास पाण्यातील शेवाळात अडकलेला त्याचा मृतदेह काढण्यात यश आले. याबाबत हवेली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.


 
18   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000048