'भीम ऍप' मध्ये त्रुटी; ग्राहकाला मिळणार १८ हजार रुपये
Sunday, Jun 3 2018 12:55PM    CHECKMATE TIMES
Tags: bhim app, problems with bhim app, use of bhim app, complaints against bhim app, chotelal prasad, bharat interface for money, grahak takrar niwaran manch 1000006737

जिल्हा ग्राहक न्यायमंचाचा आदेश

 

पुणे दि.२८ (चेकमेट टाईम्स): 'भीम ऍप' मध्ये त्रुटी असल्याने १० हजार रुपये कॉर्पोरेशन बॅंकेतून ऑनलाईन आयडीबीआय बॅंकेत वर्ग न झाल्याने ग्राहकाला १८ हजार रुपये देण्याचा निर्णय ग्राहक मंचाने दिला आहे. ऍमधील त्रुटीमुळे रक्कम जमा झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने ग्राहकाला १० हजार रुपये परत देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक न्यायमंचाने दिला आहे. तसेच ५ हजार रुपये नुकसान भरपाई आणि ३ हजार रूपये तक्रार खर्च देण्यात यावेत, असेही मंचाने आदेशात म्हटले  आहे.

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटेलाल प्रसाद (रा. शिरुर) यांनी ग्राहक मंचात दावा दाखल केला होता. त्यांनी नोडल ऑफिसर, भीम ऍप, नॅशनल पेमेंट्‌स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, द कॅपिटल, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्‍स, बांद्रा, कॉर्पोरेशन बॅंक घोडनदी शाखा, शिरुर यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता.

 

तक्रारदाराचे कॉर्पोरेशन बॅंकेत खाते असून, त्यांनी या बॅंकेच्या शिरुरमधील खात्यातून १० हजार रुपये आयडीबीआय बॅंकेच्या खात्यात वर्ग केले होते. ऑगस्ट २०१७ मध्ये हा व्यवहार झाला असून, त्याबाबतची रिसीट भीम ऍप्लिकेशनद्वारे मिळाली होती. मात्र तक्रारदाराच्या लक्षात आले की, आयडीबीआय बॅंकेच्या खात्यात १० हजार रुपये जमा झाले नसून, कॉर्पोरेशन बॅंकेच्या खात्यातून १० हजार रुपये काढण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे

 

सर्व प्रकारच्या तपासावरून हे लक्षात येते की, या ऍपमध्ये त्रुटी असून, तक्रारदाराच्या कॉर्पोरेशन बॅंकेतून १० हजार रुपये वजा करण्यात आले. मात्र, ते इतर कोणत्याही बॅंकेत जमा करण्यात आले नाहीत. यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले असून, ते नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. अखेर तक्रारदाराला १० हजार रुपये देण्यात यावेत, असा आदेश ग्राहक मंचाने दिला.

 

खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Aarthik,   Business Category: NA   Similar News ID: 1000000087