सुप्रिया सुळेंचे सेल्फी विथ खड्डा नंतर आता सेल्फी विथ कचरा आंदोलन
Wednesday, May 30 2018 5:29PM    CHECKMATE TIMES
Tags: supriya sule, lakshmi dudhane, selfie with garbage protest, selfie with khadda protest, supriya sule protest against pmc, 1000006738

महानगरपालिकेतही टाकणार कचरा

 

पुणे, दि.२८ (चेकमेट टाईम्स): बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही महिन्यांपूर्वी सेल्फी विथ खड्डाहा उपक्रम राबवला होता. त्याची मोठ्या प्रमाणात दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याची मोहीम महाराष्ट्रभर राबवली. त्या पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी सेल्फी विथ कचराहा नवीन उपक्रम राबवण्याचे सुतोवाच केले आहे.

 

वारजे येथे नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांच्या वतीने नव्याने सुरु करण्यात आलेल्या मोफत संगणक प्रशिक्षण क्लासेसचे उद्घाटन, फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या संगणक प्रशिक्षण क्लासेसचे प्रशिस्तीपत्रक वाटप आणि कर्वेनगर वारजे परिसरातील क्रीडाप्रशिक्षक व खेळांडुचा सत्कार समारंभ सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिला शहर अध्यक्षा रुपाली चाकणकर, नगरसेवक दिलीप बराटे, खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष काका चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी पुढे बोलताना सुळे यांनी सद्या दरवर्षी नवनवीन रोग येत असल्याचे सांगत, त्याचे कारण पर्यावरणात होत असलेले बदल असल्याचे सांगितले. तर कचऱ्यामुळे प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण होत असून, त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगत, आता पर्यावरण वाचवण्यासाठी आपण रस्त्यावर उतरून सेल्फी विथ कचरापासून या आंदोलनाला सुरुवात करणार असून, त्याची परिणीती नंतर प्रशासनाच्या टेबलांवर कचरा टाकण्यात होईल, असेही सुळे यावेळी म्हणाल्या.

 

कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादीच्या कर्वेनगर प्रभाग ३१ च्या नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी केले होते, सूत्रसंचालन देवेंद सूर्यवंशी यांनी केले तर ओंकार चँरिटेबल ट्रस्टचे स्वप्निल दुधाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.


खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 31,   Business Category: NA   Similar News ID: 1000000031