चेकमेट टाईम्सच्या दणक्यानंतर कर्वेनगर उड्डाणपुलाची एक समस्या मार्गस्थ
Tuesday, May 29 2018 10:57AM    CHECKMATE TIMES
Tags: karvenagar fly over, problem zone, new fly overs, karve road, nda road, bjp pune 1000006740

४८ तासांच्या आत समस्येचे निराकरण

झेंडे मात्र अजूनही डौलात

 

पुणे, दि.२५ (चेकमेट टाईम्स): श्रेयवादाच्या लढाईत उद्घाटन झालेल्या कर्वेनगर उड्डाणपुलाच्या कुरबुरींना सुरवात झाली असून, १७ फेब्रुवारी २०१७ ला उद्घाटन झालेल्या आणि उद्घाटनाच्या दिवसांचे शतक पूर्ण होण्याअगोदरच पुलावरील पथदिवे बंद पडले होते. यानंतर चेकमेट टाईम्सने पुलाच्या वर्षभराचा कारभार कसा असेल, असा प्रश्न उपस्थित करत शुक्रवार (दि.२५) वृत्त प्रसारित केले होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी ठेकेदार आणि मनपा अधिकाऱ्यांनी काम वेळेत केले नसले तरी, चांगले केले असल्याची पावती अगोदरच दिली होती, त्याचा उहापोह देखील वृत्तात करण्यात आला होता. याची दखल घेत मनपा प्रशासनाने वृत्त प्रसारित होऊन ४८ तास पूर्ण होण्याअगोदरच शनिवार (दि.२६) सर्व पथदिवे पूर्ववत सुरु केले.

 

मात्र नागरिकांनी केलेल्या तक्रारीमधील भाजपाचे झेंडे मात्र अजूनही जैसे थे अवस्थेत त्या पुलावरील पथदिव्यांच्या खांबांवर डौलाने फडकत असल्याने पुन्हा एकदा नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र त्याचवेळी काही नागरिकांनी मात्र मळलेला झेंडा म्हणजे ध्वज संहितेत अपमान असून, स्वच्छ झेंडे लावण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या या दुहेरी मागण्यांपुढे मनपा प्रशासन आणि भाजपा कार्यकर्ते कशा पद्धतीने कृती करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

 

खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 31,   Business Category: NA   Similar News ID: 1000000100