कर्वेनगर मधून मौजमजेसाठी महागड्या सायकल चोरणारे दोन जण पोलिसांनी पकडले
Wednesday, May 30 2018 8:25PM    CHECKMATE TIMES
Tags: BYCYCLE THIEFS, CYCLE THIEFS, COSTLY CYCLES THEFT, GEAR CYCLES, ALANKAR POLICE, CHILD THIEFS 1000006743

पुणे, दि.३० (चेकमेट टाईम्स): मौजमजेसाठी भारीतल्या महागड्या सायकलची चोरी करून, विकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन महागड्या सायकली व एक मोटारसायकल असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसापूर्वी अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मोटार सायकल व गिअरच्या महागड्या सायकल चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पोलीस चोरीच्या घटनांवर नजर ठेऊन होते. दरम्यान अलंकार पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई जावेद शेख व दशरथ कर्णे यांना आपल्या खबऱ्याकडून, कोथरुड परिसरात काही अल्पवयीन मुले सायकली चोरुन विकत असल्याची माहिती मिळाली होती.

 

त्यानुसार अलंकार पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंबरिष देशमुख, गणेश देशमुख, गणेश माने, राजेंद्र सोनवणे,पोलीस नाईक प्रमोद मोहिते, नवनाथ शिंदे, नितीन पडवळ, जावेद शेख आणि दशरथ कर्णे यांनी कोथरुड परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने काही महागड्या सायकल अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरल्याचे समोर आले. सदर चोरीच्या सायकल विकूण आलेले पैसे तो मौजमजा करण्यासाठी वापरत असल्याचे समोर आले आहे. तर त्याच्याकडून त्याच्या आणखीन एका साथीदाराचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.


खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 13,   Business Category: NA   Similar News ID: 1000000142