गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पांडुरंग फुंडकर यांचेही अकाली निधन
Thursday, May 31 2018 9:52AM    CHECKMATE TIMES
Tags: pandurang fundkar, agriculture minister, death of politician, bjp leader 1000006745

ग्रामविकास मंत्र्यानंतर, महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांच्या निधनाने शेतकऱ्यांच्या मनाला चटका

 

पुणे, दि.३१ (चेकमेट टाईम्स): भाजपाचे महाराष्ट्रातील मोठे नेते आणि ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि सद्याचे महाराष्ट्राचे कृषीमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पांडूरंग फुंडकर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने आज गुरुवार (दि.३१) पहाटे साडेचारच्या सुमारास मुंबईतील सौमय्या रुग्णालयात अकाली निधन झाले.

 

फुंडकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. १९९१ ते ९६ या काळात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. फुंडकर यांनी तीन वेळा अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी १९७८ आणि १९८० मध्ये खामगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. फुंडकर हे विधानपरिषदेतील विरोध पक्षनेतेही होते. ८ जुलै २०१६ रोजी त्यांनी फडणवीस मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. तर सर्वात महात्वाहे म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचे ते कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे अशा ग्रामीण भागाचा विचार करणाऱ्या नेत्याचे अकाली निधन झाल्याने ग्रामीण जनता अस्वस्थ झाली आहे.

 

आज पहाटे त्यांना ४ वाजता उलटी झाली. त्यानंतर त्यांना सुरक्षारक्षकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. विशेष म्हणजे त्यावेळी घरात फुंडकर हे एकटेच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Politics,   Business Category: NA   Similar News ID: 1000000091