ओव्हरटेकच्या वादातून ट्रक चालकाचा खून; कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावरील घटना
Thursday, May 31 2018 10:54AM    CHECKMATE TIMES
Tags: murder, murder of truck driver, overtake dispute, katraj dehuroad bypass, jambhulwadi tunnel 1000006747

बसचालक ताब्यात

 

पुणे, दि.३१ (चेकमेट टाईम्स): ओव्हरटेक करण्याच्या वादातून बसचालकाने केलेल्या मारहाणीत ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सदरील घटना कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर जांभूळवाडी बोगद्याजवळ घडली असून, बसचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, लालजी पाल असे मृत्युमुखी पडलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. लालजी पाल हे बेंगलोर वरून मुंबईला ट्रक घेऊन जात असताना, आज गुरुवार (दि.३१) पहाटे दोनच्या सुमारास त्यांची ट्रक खेडशिवापूर टोल नाका ओलांडून पुढे आली असता, कात्रज जांभूळवाडी बोगद्याजवळ त्यांना बस चालक आणि बसमधून उतरलेल्या तिघांनी ओव्हरटेक मध्ये झालेल्या चुकीवरून अडवत, मारहाण करण्यास सुरवात केली.

 

यामध्ये पाल यांचे डोके रस्ता दुभाजकाच्या सिमेंट ब्लॉकवर जोराने आपटले. यावेळी त्याच्याच मागे पाल यांच्या गाडीचे मालक दुसरी ट्रक घेऊन येत होते. यावेळी त्यांना आपला ट्रक उभा असून, भांडणे चालू असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने ट्रक बाजूला घेत, जखमी पाल यांना रुग्णालयात उपचारार्थ हलवले. मात्र पाल यांचा मृत्यू झाला. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून, बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 

9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000045