संस्कृत ग्रंथकार अजय लोमटे यांचा शंभुसेनेकडून सन्मान
Sunday, Jun 3 2018 1:01PM    CHECKMATE TIMES
Tags: shambhusena, ajay lomte, budhbhushan, deepak shirke, shivaji maharaj, sambhaji maharaj, budhbhushan by sambhaji maharaj, 1000006751

पुणे दि.३१ (चेकमेट टाईम्स): छत्रपती शंभुराजेंनी वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी शृंगारपुराच्या निसर्गरम्य ठिवणी 'बुधभूषणम्' नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणा घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील अजय लोमटे यांनी वयाच्या २१ व्या वर्षी अजेयत्रिशती (अजिंक्य असणारे ३०० श्लोक) नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. या ग्रंथात ६८ विषयांवर आधारित ३०० श्लोक आहेत. देव, पुरुष, धर्म, तत्व, रक्तदान, अवयवदान, दुर्गसंवर्धन, देश, समाज, भगवदगीता, इत्यादी ६८ विषय आहेत. लवकरच या संस्कृत ग्रंथाचे प्रकाशन होत आहे.

 

शंभुराजेंची प्रेरणा घेऊन समाजोपयोगी संस्कृत ग्रंथ लिहिल्याबद्दल मंगळवार (दि.२९) रोजी शंभूसेना भवन (लोहगाव), पुणे येथे शंभुप्रेरित संस्कृत ग्रंथकार अजय लोमटे यांचा शंभुसेनेच्या वतीने शंभूसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपशिर्के, प्रदेश संघटक सचिन हाडोळे, बीड जिल्हाध्यक्ष सचिन होनमाने, प्रदेश प्रवक्ते सागर जगताप, आनंद जयस्वाल यांच्याकडून सन्मान करण्यात आला व भावी ग्रंथास शंभुसेनेकडून शुभेच्छा देण्यात आल्या .

 

संस्कृत ग्रंथकार अजय लोमटे यांना ते लिहीत असलेल्या भावी छत्रपती शिवराय व छत्रपती शंभूराजे यांच्या संस्कृत ग्रंथासाठी शंभुसेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष दीपक शिर्के यांनी मार्गदर्शन केले.


खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
0   
1
प्रतिक्रिया
1000001730 Ajay Lomate   from  Osmanabad     Jun 4 2018 4:12PM
मन: पूर्वक खूप खूप आभार  
  0     0
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Sahitya,   Business Category: NA   Similar News ID: 1000000074