संत निरंकारी फाऊंडेशनद्वारा पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता अभियानाचे आयोजन
Sunday, Jun 3 2018 1:07PM    CHECKMATE TIMES
Tags: international environment day, saint nirankari charitable foundation, cleanliness drive by saint nirankari foundation, saint nirankari charitable foundation social programmes, international environment day theme 2018, swach bharat mission 1000006752

पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): मंगळवार (दि.५ जून) रोजी 'जागतिक पर्यावरण दिवस' निमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारा देशातील ७ राज्यांमधील १४ थंड हवेच्या ठिकाणी विशाल स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून, वृक्षारोपण केले जाणार आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे पर्यावरणावरणाचे संकट निर्माण होत चालले आहे, त्यासंदर्भात नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 

संयुक्त राष्ट्र संघाने यावर्षी 'जागतिक पर्यावरण दिवस' साजरा करण्यासाठी भारत देशाला अग्रणी देश म्हणून घोषित करून 'प्लास्टिक प्रदूषण हटवुया' असा विषय देण्यात आला आहे. या १४ ठिकाणांमध्ये पुणे जिल्ह्यातील लोणावळा, खंडाळा या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या अभियानांमध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन चे हजारो स्वयंसेवक, सेवादल, अन्य श्रद्धाळू भक्त, स्थानिक नगरपरिषद लोणावळा योगदान देणार आहेत. याचबरोबर महाराष्ट्रातून महाबळेश्वर, पाचगणी येथे याच पद्धतीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

सकाळी ७:३० ते दुपारी १२:३० पर्यंत हे अभियान होणार असून, फाऊंडेशन चे युवा कलाकार 'प्लास्टिक प्रदूषण हटवुया' या विषयावर पथनाट्य सादर करणार आहेत.

 

संत निरंकारी मिशन आध्यात्मिक जागरूकतेबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून मानवतेच्या सेवेसाठी समर्पित आहे. आज मिशन देशामध्ये स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणारी अग्रणी संस्था आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून संत निरंकारी मिशन स्वच्छता अभियान, वृक्षारोपण यासारखे कार्यक्रम आयोजित करत आहे. मा. प्रधानमंत्री यांच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये फाउंडेशन ने महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. २०१५ मध्ये फाउंडेशन ला स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्त केले गेले आहे. प्रत्येक वर्षी देशभरामध्ये ऐतिहासिक स्थळ, समुद्र, नद्यांचे किनारे, हॉस्पिटल्स तसेच रेल्वे स्टेशन वर विशेष रूपाने स्वच्छता अभियान राबविले जाते.


खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Agriculture,   Business Category: NA   Similar News ID: 1000000148