मुठा नदीपात्रात महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ
Friday, Jun 1 2018 11:41AM    CHECKMATE TIMES
Tags: woman body found in mutha river bed, unknown woman body found in deccan, sasoon hospital pune, woman murdered in mutha river bed, deccan police station, 1000006753

पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली असून, डेक्कन परिसरातील मुठा नदीपात्रात हात पाय बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. महिलेच्या शरीरावर वार आढळून आल्याने तिचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो नदीपात्रात टाकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आला असून, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवार (दि.३१ मे) रोजी मुठा नदीपात्रात नागरिकांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्याची माहिती मिळताच डेक्कन पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढला. महिलेचे हात पाय मागील बाजूस बांधून मृतदेह पोत्यामध्ये टाकला होता. मृतदेहाची स्तिथी पाहता, अनेक दिवसापूर्वी मृतदेह या ठिकाणी टाकल्याचे समजते.

 

महिलेचे वय अंदाजे ३० ते ४० वर्षे असून, तिने नीळसर कुर्ता आणि चॉकलेटी रंगाची लेगिन्स परिधान केलेली आहे. महिलेच्या डाव्या हातावर संजय असे मराठीत गोंदलेले आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 14,   Business Category: NA   Similar News ID: 1000000045