'निपाह' उपचारासाठी महानगर पालिका प्रशासन सज्ज
Sunday, Jun 3 2018 12:50PM    CHECKMATE TIMES
Tags: nipas virus, nipas treatment in pune, naidu hospital pune, pmc system for nipas patients, seperate ward for nipah at naidu hospital, keral 1000006754

नायडू रुग्णालयात 'निपाह' रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड

 

पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): 'निपाह' विषाणूने केरळमध्ये थैमान घातले असून, त्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. याच रोगाचे रुग्ण गोव्यात देखील आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या वतीने नायडू रुग्णालयात 'निपाह' रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्यात येणार असून, त्याबद्दल आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

 

'निपाह' रोगावरील उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये वार्ड तयार करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र ससून प्रशासनाकडून काही कारणास्तव ही मागणी फेटाळण्यात आली. त्यानंतर महानगर पालिकेचे नायडू रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

पुणे शहर आणि परिसरात अद्याप तरी 'निपाह' चा रुग्ण सापडलेला नाही. त्याचबरोबर संशयित रुग्ण देखील आढळला नाही. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून महानगर पालिकेतर्फे ही सोय करण्यात आली आहे. तसेच येत्या आठवड्याभरात राज्यात पावसाळा सुरु होणार असल्याने अनेक प्रकारच्या साथीच्या आजारांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खबरदारी घेण्यासोबतच औषधांचा पुरेसा साठा महानगर पालिका प्रशासनाकडे उपलब्ध करण्यात आला आहे.
खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
 
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Health,   Business Category: NA   Similar News ID: 1000000055