पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर जयंती विशेष
Sunday, Jun 3 2018 1:12PM    CHECKMATE TIMES
Tags: ahilyadevi holkar jayanti, ahilyadevi holkar, who is ahilyadevi holkar, shivahi maharaj, bajirao peshwa, ahilyadevi holkar and her work, ahilyadevi holkar and her initiative, 1000006755

पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची जयंती सर्वत्र साजरी केली जाते. आज महानगर पालिकेचा मिळकतकर आपण पहिल्या महिन्यात भरल्यास ५ टक्के सुट अशी कल्पना ज्या महिला प्रशासकास सुचली त्या म्हणजे अहिल्या देवी. जागेचा '७ / १२ उतारा' हा शब्द त्यांनी मराठी भाषेस दिला (लिंबु, चिंच, सीताफळ, आंबा, जांभुळ, निंब इ. ७ झाडे जमीन  मालकाने लावल्यास, बाकी ५ झाडे सरकार लावून देईल  ७ + ५ = १२), वाटमारु करणाऱ्या दरोडेखोराना तुरूंगात खितपत ठेवण्यापेक्षा सैन्यात जबाबदारी देऊन त्यांचे पुर्नवसन करायची कल्पना देखील अहिल्या देवी यांचीच.

 

सुरत आणि मध्यप्रदेश च्या विणकराना प्रोसाहन देउन माहेश्वरी हा वस्त्राचा ब्रँड तयार केला, पानिपतच्या युद्धामुळे झालेल्या विधवांना हातमागावर काम मिळाले आणि देशात तसेच परदेशात 'माहेश्वरी' साड्या, कापडा चे नाव झाले. तळी, अन्नछ्त्रे, धर्मशाळा त्याचबरोबर नदीवरचे सुबक घाट बांधले.

 

त्यांचे सासर बारामती - फलटण रस्तावरील 'होळ' गावाचे आणि माहेर खानदेशचे. धनगर समाज हा फक्त शेळ्या मेंढ्या पाळत नाहीत तर म्हैस, घोडे देखील पळत असत आणि युद्दकाळी ते घोडे मराठा, ब्राह्मण, भंडारी इत्यादी जातीच्या लोकांना भाड्याने देत असे.

 

शिवाजी महाराजांच्या सरदेशमुखीत बारामती येत असल्याने एकदा ते होळकरांच्या पुर्वजास भेटले, आणि त्यांची भालाफेक, तलवारबाजी पाहुन त्यांना सैन्यात नोकरीस ठेवले. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश मधील शेकडो धनगर या काळात मराठा सैन्यात आले.

 

बाजीराव पेशव्यानी मल्हारराव होळकर यांना त्यांच्या पराक्रमामुळे मध्य प्रदेशमधील इंदुरची जहागीर मिळावी असे प्रयत्न केले. बाजीराव स्वतः अनेकदा जेजुरीला श्री खंडोबा मंदीरात जात, नवीन चांगल्या घोडेस्वार लोकांना भरती करायला. अनेकदा धनगरच्या सोबत ते जेवण करत असे उल्लेख सापडतात.

 

त्याच्या सामाजिक कामामुळे माधराव पेशवे (बाजीरावांचे नातु) त्यांना मातोश्री अहिल्यादेवी आणि 'पुण्याचे पुण्यद्वार माहेश्वर येथे आहे' असे म्हणत.


खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Cultural,   Business Category: NA   Similar News ID: 1000000089