पुण्यात पवार आणि गडकरी भेट; राजकीय चर्चांना उधान
Friday, Jun 1 2018 8:42PM    CHECKMATE TIMES
Tags: meeting in sharad pawar and nitin gadkari, ncp leader, bjp leader, maharashtra politics 1000006758

पुणे, दि.१ (चेकमेट टाईम्स): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यात आज शुक्रवार (दि.१) दुपारी दोन वाजता पुण्यातील हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरीयटमध्ये बंद खोलीत चर्चा झाली.

 

नुकत्याच झालेल्या पालघर पोटनिवडणुकीत भाजपने शिवसेनेला धूळ चारत विजय संपादित केला. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला मित्र पक्षांची गरज उरली नसल्याचे सांगत, भविष्यात युती न करण्याचे स्पष्ट केले. त्यातच दोन ठिकाणी झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकांपैकी एका ठिकाणी राष्ट्रवादीने देखील विजय मिळवला. त्यामुळे राष्ट्रवादीची शक्ती वाढते आहे, हे यातून स्पष्ट होत असतानाच, पवार आणि गडकरी यांच्या गुप्त भेटीला महत्त्व आले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक चर्चा होत असल्याने, दोन्ही भिन्न विचारी पक्षाच्या बड्या नेत्यांच्या भेटीचा अर्थ काढण्यास राजकीय विश्लेषकानी सुरुवात केली आहे. या घडामोडींमुळे राजकीय उलथापालथ पाहायला मिळण्याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. तुम्हाला याबाबत काय वाटते व्यक्त व्हा प्रतिक्रिया बॉक्स मध्ये.

 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Politics,   Business Category: NA   Similar News ID: 1000000003