VIDEO अजित पवारांनी खडकवासल्याच्या संभाव्य उमेदवाराच्या नावाचे दिले संकेत
Sunday, Jun 3 2018 10:58AM    CHECKMATE TIMES
Tags: Signal of Assembly election candidates, Pune Assemblys, Ajit Pawar Signals In Speech, khadakwasla assembly 1000006759

पुणे, दि.३ (चेकमेट टाईम्स): कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने शहरातील सर्वच्या सर्व विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये उर्जा फुंकण्याचे काम करणाऱ्या अजित पवारांनी खडकवासला मतदार संघातील हल्लाबोल, भीम फेस्टिवल नंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये खडकवासला मतदार संघाची उमेदवारी कोणाला असेल, याचे संकेत दिले असल्याचे दिसते.

 

मात्र ते नक्की कोणत्या क्षणी दिले आहेत, हे तुम्हाला हा व्हिडिओ कुठेही क्षणभर देखील स्किप न करता पाहिल्यानंतरच लक्षात येईल. नेहमीप्रमाणे खडकवासला विधानसभा मतदार संघात इच्छुकांची संख्या मोठी आहे. संभाव्य उमेदवार कोण असेल याबाबत राजकीय अभ्यासक, सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आडाखे बांधत आहेत. प्रत्येक संभाव्य उमेदवाराबाबत आडाखे बांधले जात आहेत. कोण कोणत्या बाबतीत आघडीवर आहे, तर कोणाची कोणती पडती बाजू आहे, यावर चर्चा सुरु असल्याच्या ऐकायला मिळत आहेत. तशाच चर्चा अजित पवार यांच्या देखील कानावर असू शकतात, त्यामुळेच की काय, अजित पवारांनी खडकवासला मतदार संघाच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मोठी सूचक विधाने करत, संभाव्य उमेदवारीबाबत उहापोह केल्याचे पहायला मिळाले.

 

मात्र यंदा खडकवासला जिंकायचाच असा चंग अजित पवारांनी बांधला असल्याचे त्यांच्या एकूणच भाषणातून दिसून आले. त्यामुळे इथे नागरिकांच्या मनातला उमेदवार कॉमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करण्याची निश्चितच मतदारांना आणि संभाव्य उमेदवारांच्या पाठीराख्यांना संधी आहे. पहा काय म्हणालेत अजित पवार, कुठे आणि कसे दिलेत संकेत, कोण कोण असू शकतात अजित पवारांच्या मनातील उमेदवार याची उकल तुम्हाला या व्हिडीओ मधून होणार आहे. मात्र एखाद्या सेकंदात देखील दादांचे एखादे वाक्य तुमच्या कानावर पडायचे राहू शकते. तेव्हा पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि सर्वात महत्वाचे, भविष्यातील महत्वाचे व्हिडीओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी आमचे channel सबस्क्राईब करायला विसरू नका.

 


खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
0   
0
प्रतिक्रिया
1000001771 Anant Chavan   from  Pune     Sep 1 2018 11:42PM
काकासाहेब चव्हाण  
  0     0
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Politics,   Business Category: NA   Similar News ID: 1000000036