जेजुरी’वरून पुण्याकडे येताना बोपदेव घाटात बस उलटली; प्रवासी जखमी
Sunday, Jun 3 2018 12:22PM    CHECKMATE TIMES
Tags: accident, bus accident, bopdeo ghat bus accident, jejuri pune road, mp bus, saswad 1000006760

पुणे, दि.३ (चेकमेट टाईम्स): मध्यप्रदेशातून देवदर्शनाला आलेल्या भाविकांच्या बसला जेजुरी वरून पुण्याकडे येताना बोपदेव घाटात अपघात झाला. यामध्ये बस उलटून दहा ते बारा प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


खालील लाईक चिन्हावर क्लिक करून आमचे फेसबुक पेज लाईक करा


याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रविवार (दि.३) सकाळी सदरील अपघातग्रस्त बस जेजुरी वरून पुण्याकडे येण्यासाठी निघाली, मात्र सासवड वरून बोपदेव घाट मार्गे येत असताना, बोपदेव घाटाच्या सुरवातीलाच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यास बस रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा दगडांना धडकून उलटली. यामध्ये बसमधील सुमारे दहा ते बारा प्रवासी जखमी झाले असून, त्यांना ग्रामस्थांनी उपचारार्थ रुग्णालयात हलवले आहे.

 

ब्रेक न लागल्याने सदरील अपघात झाल्याचे सांगितले जात असून, अपघात झाला त्या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला खोदाई केली असल्याने, खड्ड्यात बस घुसू नये असा प्रयत्न करत असताना, चालकाचा बसवरील ताबा सुटला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींची नावे समजली नाहीत


अशा महत्वाच्या बातम्यांचे व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी आमचे युट्युब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ज्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन स्वरुपात आमचे व्हिडीओ मिळतील.


0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000043