खोदलेले पदपथ दुरुस्त कोण करणार? नागरिकांचा सवाल
Sunday, Jun 3 2018 12:44PM    CHECKMATE TIMES
Tags: footpath, padestrian way, repair work, mngl gas line, kothrud, shrikant thakarey road 1000006761

पुणे, दि.३ (चेकमेट टाईम्स): कोथरूड मधील सुस्थितीत असलेला पदपथ गॅस पाईप लाईन साठी खोदला, मात्र तो परत होता तसा करण्याची जबाबदारी कोणाची? प्रशासनाचे याकड एलाक्ष नाही का? असा सवाल कोथरूड भागातील नागरिकांनी केला आहे. तर संबंधितानी पादचारी प्रथम या नियमाचे पालन करून, नादुरुस्त पदपथ दुरुस्त करावा, खोदाई करून, अर्धवट काम टाकून जात पादचाऱ्यांच्या अपघातांना कारणीभूत असणाऱ्यांवर प्रसंगी फौजदारी कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

 

महिन्यापूर्वी, महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने कोथरूड मधील श्रीकांत ठाकरे पथ रस्त्यावर, महेश विद्यालयासमोरील सुस्थितीत असलेला पदपथ खोदला होता. सदर खोदलेला भाग व्यवस्थित न बुजवल्यामुळे तिथे खड्डा तयार झाला आहे. या खड्डयामुळे पादचाऱ्यांना गंभीर इजा होऊ शकते. आता पावसाळा आला असून, तेथे अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न कोथरूडकरांनी विचारला आहे. तर संबधित विभागाने तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

 

खालील लाईक चिन्हावर क्लिक करून आमचे फेसबुक पेज लाईक करा
व्हिडीओ आवडल्यास आमचे चॅनल सबस्क्राईब करा.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 12,   Business Category: NA   Similar News ID: 1000000095