निवृत्त झालेल्या पोस्टमन दत्तात्रय मिदगुले यांचा सन्मान
Monday, Jun 4 2018 7:27PM    CHECKMATE TIMES
Tags: postman dattatray midgule, post service, murlidhar dalvi, anna jogdand, indian post service, 1000006762

पुणे दि.४ (चेकमेट टाईम्स): 'मानवी हक्क संरक्षण आणि जागृती' यांच्या वतीने पिंपळे गुरव येथील पोस्टमन दत्तात्रय बाबूराव मिदगुले यांचा पोस्ट फीसमध्ये जासत्कार करण्यात आला. मिदगुले हे गेली अनेक वर्षे पोस्ट खात्यात पोस्टमन म्हणून सेवा बजावत असून, नुकतेच ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या या सेवेचा गौरव करण्यासाठी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मुरलीधर दळवी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला असून, या वेळी शहराध्यक्ष आन्ना जोगदंड उपस्थित होते.

 

या वेळी बोलताना शहराध्यक्ष आन्ना जोगदंड म्हणाले, मिदगुले यांच्याकडे सायकल सुद्धा नव्हती. ते बरेच वर्षे पायी चालत जान दोन, तीन मजले चढुन जनसेवा करीत असे. एखाद्या व्यक्ती चे महत्त्वाचे कागदपत्र किंवा तरुणांचे नोकरीचे, मुलाखतीचे पत्र सेल तर संध्याकाळी उशीरा घरी जाऊन पत्र देत से. गेली पंचवीस वर्षे ते सांगवी परीसरात नोकरी करीत होते. त्या मुळे नागरिकांचे व त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. शा प्रमाणिक व्यक्ती चा सन्मान  केल्याचे समाधान आम्हाला वाटले."   

                       

यावळी शहर उपाध्यक्ष विकास शहाने, तितकारे डि. बी, कार्यालयीन सहाय्यक धनंजय शहाने, एस. एस. जाधव, बने एम. यू. राजेश वाघमारे, बाळकृष्ण जंगम, तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. 


खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Cultural,   Business Category: NA   Similar News ID: 1000000079