जाहिरातीचा फलक डोक्यावर पडल्याने पुनावळे येथे महिलेचा मृत्यू
Monday, Jun 4 2018 7:21PM    CHECKMATE TIMES
Tags: woman died in punawale, woman died by hoarding, hoarding fell on woman, kantabai vishwnath bharti, death due to hoarding, punawale, punawale woman death, 1000006764

पुणे दि.४ (चेकमेट टाईम्स): अपेक्षेप्रमाणे मान्सूनपूर्व पावसाला पुणे शहर आणि परिसरात सुरुवात झाली आहे. या पावसासोबत वादळी वाऱ्याने देखील शहरात हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवार (दि.) रोजी पिंपरी - चिंचवड शहर आणि परिसरात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. पुनावळे येथे घडलेल्या घटनेत जाहिरातीचा फलक डोक्यावर पडल्याने एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला. कांताबाई विश्वनाथ भारती (वय ५५, रा. चिखली) असे फलक डोक्यावर पडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कांताबाई शुक्रवार (दि.१) रोजी सायंकाळी पुनावळे येथील चौकातून जात होत्या. त्यावेळी अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसाबरोबरच   असलेल्या वादळी वाऱ्यामुळे चौकात असलेला बेंचमार्क रिअॅलिटी हा जाहिरात फलक कोसळला. नेमक्या त्याच वेळी कांताबाई फलकाच्या खालून जात असल्याने फलक त्यांच्या अंगावर पडला. या घटनेत कांताबाई गंभीर जखमी झाल्या.

 

त्यानंतर उपचारासाठी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हिंजवडी पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे, जाहिरात फलक तसेच इतरही अनेक गोष्टींची पडझड होत असल्याने नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000043