आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या
Monday, Jun 4 2018 6:57PM    CHECKMATE TIMES
Tags: youth suicide due to loan, rajesh manoj roy, salim ali park, youth suicide in salim ali park, youth hanged himself in park, youth hanged himself because of loan, suicide in pune, yerawada 1000006766

पुणे दि.४ (चेकमेट टाईम्स): मागील वर्षी झालेल्या पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवार (दि.२८) रोजी सकाळी सलीम अली अभयारण्यात झाडाला गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. राजेश मनोज रॉय (वय ३०, रा. गणेशनगर, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे असून, तो आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता होता.

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.२८) रोजी सकाळी मॉर्निग वॉकला गेलेल्या नागरिकांना ही घटना लक्षात आली. अभयारण्यातील एका झाडाला ओढणीने गळफास घेऊन राजेशने आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर नागरिकांनी तात्काळ येरवडा पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह झाडावरून खाली उतरविण्यात आला. राजेशच्या पश्‍चात पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब आहे.

 

गेल्या वर्षी झालेल्या पुणे महानगर पालिका निवडणुकीत राजेश रॉय हा प्रभाग क्र. ६ मधून अपक्ष म्हणून निवडणुकीला उभा राहिला होता. या निवडणुक खर्चासाठी राजेशने सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. पण निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आणि त्याला आर्थिक समस्या भेडसावू लागली. त्यामुळे कर्जाला कंटाळलेल्या राजेशने अखेर गळफास घेऊन आपले जीवन संपविले. खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 6,   Business Category: NA   Similar News ID: 1000000044