समलैंगिक संबंधांच्या समर्थनार्थ पुण्यात तृतीयपंथियांची पदयात्रा
Monday, Jun 4 2018 6:41PM    CHECKMATE TIMES
Tags: transgenders protest in pune, transgenders march in pune, aricle 377, what is article 377, gay march in pune, demands of pune transgender march, section 377 of ipc code, transgender, gay, third gender, 1000006767

पुणे, दि.४ (चेकमेट टाईम्स): समलैंगिक संबंधांना फौजदारी गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड संहितेतील कलम ३७७ रद्द करावे, या मागणीसाठी पुण्यात समपथिक ट्रस्टच्या वतीने अभिमान पदयात्रा काढण्यात आली. जगातील अनेक देशांत समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देण्यात आली असून, भारतात मात्र या संबंधांना अद्याप मान्यता देण्यात आली नाही.

 

भारतीय दंड संहिता कलम ३७७ अन्वये समलैंगिकता हा गुन्हा मानण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही हे कलम योग्यच असल्याचे म्हटले होते. समलैंगिक ओळखीमुळे समलैंगिकांना भीतीच्या वातावरणात जगावे लागत असून, त्यांच्या अधिकारांचे हननही होत आहे. तर सामाजिक नैतिकता काळानुसार बदलत असते. त्यामुळे कायदाही काळानुसार बदलतो. केंद्र सरकारने हे ३७७ कलम रद्द करावे आणि या देशात समलैंगिक, तृतीयपंथांनी हक्काचे स्थान दयावे, या मागणीसाठी दरवर्षी ही अभिमान पदयात्रा काढली जाते.

 

जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यान येथून या पदयात्रेला सुरवात झाली. एफसी रोड मार्गे परत संभाजी उद्यान येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी राज्यभरातून गे, तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर सहभागी झाले होते.खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Women,   Business Category: NA   Similar News ID: 1000000063