प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून
Monday, Jun 4 2018 6:44PM    CHECKMATE TIMES
Tags: wife murdered husband, satara murder case, pasarani ghat murder case, wai police, satara police, diksha kambale, nikhil malekar, anand kambale, wife with boyfriend murdered husband, satara murder case revealed, 1000006768

पसरणी घाटातील खुनाचे गूढ उकलण्यात सातारा पोलिसांना यश

 

पुणे दि.४ (चेकमेट टाईम्स): साताऱ्यातील पसरणी घाटात शनिवार (दि.२) रोजी नवदांपत्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात पतीचा खून झाला होता. पुणे आणि परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेचे गूढ उकलण्यात सातारा पोलिसांना यश आले असून, पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी दीक्षा कांबळे व तिचा प्रियकर निखिल सुदाम मळेकर (वय २४, रा. चिखली, जि. पुणे) या दोघांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील इतर चार मारेकरी अद्याप फरारी असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच आनंद आणि दीक्षा यांचा विवाह झाला होता. तक्रारदार राजेश बोबडे, त्यांची पत्नी कल्याणी, मित्र आनंद कांबळे आणि त्यांची पत्नी दीक्षा असे चौघे मोटारीने महाबळेश्वरला निघाले होते. पसरणी घाटात गाडी आली असता उलटी होत असल्याचे कारण सांगून दिक्षाने गाडी थांबवण्यास सांगितली. त्याचवेळी पाचगणीहून दुचाकीवर आलेल्या चार युवकांनी आनंदवर कोयत्याने वार करून खून केला.

 

प्रथमदर्शनी ही घटना दरोड्याच्या उद्देशाने झाली असल्याचे दिसत होते, मात्र पोलिसांनी दीक्षाकडे कसून चौकशी केली असता, तिने प्रियकर निखिल मळेकरच्या मदतीने पती आनंद यांचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ पुण्यातील निगडी परिसरातून निखिल मळेकरला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने इतर चार जणांच्या मदतीने आनंदचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी खून प्रकरणात दीक्षा कांबळे व निखिल मळेकर यांना अटक केली.खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000045