राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन व ऐतिहासिक भव्य मिरवणूक
Wednesday, Jun 6 2018 5:45PM    CHECKMATE TIMES
Tags: ahilyadevi holkar jayanti, ahilyadevi holkar, hilyadevi holkar jayanti rally pune, samajbhushan puraskar, vijay shivtare, who is ahilyadevi holkar 1000006769

पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंती महोत्सवाची सुरुवात शनिवारवाडा ते सारसबाग अशा मिरवणुकीने झाली. यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक वाद्य ढोल पथक, हलगी, मैदानी खेळ, धनगर लोकप्रिय नृत्य, तसेच घोड्यावर पारंपरिक वेशात महिला सहभागी झाल्या होत्या होते. त्याचबरोबर पारंपरिक वेशभूषेत हजारो धनगर बांधव या मिरवणुकीसहभागी झाले होते. शनिवार वाड्यापासून सुरु झालेल्या या मिरवणुकीची श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती चौक, फडगेट पोलीस स्टेशन, स्वारगेट मार्गे सारसबाग येथे सांगता झाली.

 

यावर्षी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात आमदार दत्ता भरणे, पुणे जि. प. अध्यक्ष विश्वास देवकाते आणि आमदार नारायण आबा पाटील यांना 'समाजभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

या कार्यक्रमाचे उद्घाटन जलसंपदा राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅ. अण्णा पाटील, प्रमुख प्रवक्ते मिथुन आटोळे, आमदार योगेश टिळेकर, गोपीचंद पडळकर, तुकाराम करे, नगरसेवक उदय डांगे, शशिकला वाघमारे, मोहन शेंडगे व या कार्यक्रमाचे आयोजक घनश्याम बाप्पू हाक्के उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना विजय बाप्पू शिवतारे म्हणाले, "धाडसी प्रराक्रमी व प्रशासनावर प्राधान्य निर्माण करण्याऱ्या पहिल्या महिला म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे ना घ्यावे लागेल."

 

आमचे प्रेरणा स्थान राजमाता अहिल्यादेवी होळकर आहेत. त्यांनी समाजामध्ये योग्य मार्ग दाखवला, स्त्रियांनी एकत्र येऊन संघटित व्हावे व राजमातेचे विचार आत्मसात करावेत असे मत ह्या कार्यक्रमाचे आयोजक घनश्याम बाप्पू हाक्के यांनी व्यक्त केले. यावेळी हजारोंचा समुदाय सारसबाग येथे उपस्थित होता.खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर अर्थात तुम्ही आमचे फेसबुक पेज अद्याप लाईक केलेले नाही. लाईक चिन्हावर क्लिक करून आमचे पेज लाईक करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Cultural,   Business Category: NA   Similar News ID: 1000000089